शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

१५० किलो वजन, ८ फुट लांब; शेतातील विहिरीत महाकाय मगर आढळल्याने खळबळ

By बाबुराव चव्हाण | Updated: September 28, 2024 11:30 IST

फवारणीसाठी शेतात गेले अन् विहिरीत आढळली मगर; वडगाव लाख शिवारात खळबळ

- अजित चंदनशिवेतुळजापूर : तालुक्यातील वडगाव लाख येथील मारुती मंदिर ट्रस्टच्या शेतजमिनितील ३५ फूट विहिरीत गुरुवारी आढळून आलेली जवळपास १५० किलो वजनाची ८ फुटी मगर शनिवारी पहाटे पकडण्यात वनविभागाच्या रेस्क्यू पथकाला यश आले. यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला.

तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख येथील शेतकरी महादेव शिंदे हे गुरुवारी दुपारी फवारणीसाठी पाणी आणण्याकरिता मारुती मंदिर ट्रस्टच्या शेतजमिनीतील विहिरीवर गेले होते. अंदाजे ३५ फूट खोल असणाऱ्या या विहिरीत मगर आढळून आली. ही वार्ता पसरताच खळबळ उडाली होती. दरम्यान, माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.  ग्रामस्थाच्या मदतीने विहिरीतील पाणी काढण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र, पाणी काढण्यासाठीची सामुग्री उपलब्ध न झाल्याने सायंकाळ झाली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ग्रामस्थानी चार विद्युत मोटारी व एक जनरेटरची सुविधा उपलब्ध करून वहिरीतील पाणी बाहेर काढले. 

शनिवारी पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास मगर विहिरीच्या बाहेर काढण्यात रेस्क्यू पथकाला यश आले. यासाठी वन अधिकारी बी. ए. पोळ, सहाय्यक वनसंरक्षक व्ही. बी. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी राहूल शिंदे व वन्यजीव रक्षक सेवाभावी संस्था उदगीर यांच्या पथकाने परिश्रम घेतले. दरम्यान, वन विभागाने संबंधित मगर नैसर्गिक अधीवासात सोडली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद