प्रत्येक बॅंकेच्या शाखेत व पेन्शनरांची खाती मोठ्या प्रमाणात आहेत. प्रत्येक महिन्याच्या १ ते ७ तारखेला व पेन्शनरांची गर्दी होती. अनेक नोकरदारांचे पगार बॅंकांच्या खात्यावर जमा होतात. यातील काहीजण स्वत: बॅंकेतून पैसे काढतात. सेवानिवृत्त लोकांनी सेवानिवृत्तीनंतर आलेली रक्कम बॅंकेत ठेवून त्याच्या व्याजावर आपली गुजराण सुरू ठेवली आहे. ते प्रत्येकजण ठेवीचे व्याज घेण्यासाठी महिन्याला बॅंकेत येत असतात. याशिवाय काहीजण शासकीय योजनांचे अनुदान तसेच पीक विम्याची माहिती विचारण्यासही लोकांचा वावर बॅंकेत राहतो. बॅंकांसमोर रांगा लागत असल्यामुळे कोरोना संसर्ग फैलावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्रिया....
बॅंकेची वेळ कमी झाल्याने गर्दी वाढत आहे. एकाचवेळी सर्वांना आर्थिक व्यवहार करायचे असल्याने बॅंकांच्या शाखांसमोर रांगा लागत आहेत. त्यामुळे बॅंकांची वेळ वाढविण्याची गरज आहे.
आबासाहेब सावंत
बॅंकेत एकच कॅशकाऊंटर असल्याने बॅंकेत गर्दीमध्ये उभे राहावे लागते. बॅंकेत कॅशकाऊंटर वाढविल्यास गर्दी होणार नाही व रांगेत उभे राहावे लागणार नाही.
मच्छिंद्र क्षीरसागर
आमचा छोटा व्यवसाय आहे. व्यवसायानिमित्त आम्हाला ग्राहकांकडून काही वेळेला चेक दिले जातात. धनादेश भरण्यासाठी अधूनमधून बॅंकेत यावे लागते.
पृथ्वीराज पाटील,
स्टेट बँक, मुख्य शाखा, उस्मानाबाद
उस्मानाबाद शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत शहरासह ग्रामीण भागातील नागरिकही येतात त्यामुळे शाखेत दररोज गर्दी होते. विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांच्या रांगा लागतात. लोकांना कोरोनाविषयक नियमात पालन करायला लावण्यासाठी चौकीदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र, तरीही अनेकजण फिजिकल डिस्टन्सचे पालन करीत नाहीत.
बॅंक ऑफ इंडिया
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बॅंक ऑफ इंडिया शाखेत शहर तसेच परिसरातील नागरिक आर्थिक व्यवहार करण्यासाठी येतात. बॅंकेत एकच कॅशकाऊंटर असल्याने बॅंकेबाहेर रांग लागते. रांगेत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. अशीच स्थिती शहरासह ग्रामीण भागातही आहे.
कोट...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाने बॅंकेची वेळ ११ ते २ केली आहे. या काळात बॅंका सुरू राहत आहेत. दोन दिवसाला बॅंकांचे सॅनिटायझेशन केले जात आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी बॅंकांना सूचना दिल्या आहेत.
नीलेश विजयकर, जिल्हा अग्रणी बॅंक