शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

'प्रसाद खाऊन झोपली होतीस तेव्हा..';क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत महाराजाकडून विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 1:33 PM

बीड जिल्ह्यातील एक ३५ वर्षीय महिला उस्मानाबाद जिल्ह्यातील मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराजांची भक्त होती.

कळंब (जि.उस्मानाबाद) : यापूर्वी ठेवलेल्या शरीरसंबंधांचा व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका महाराजाने विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी दुपारी मलकापूरच्या मठात घडली आहे. याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन शुक्रवारी पहाटे आरोपी महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील एक ३५ वर्षीय महिला उस्मानाबाद जिल्ह्यातील मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराजांची भक्त होती. २८ जुलै रोजी ती एकटीच मलकापूर येथील मठात दर्शनासाठी गेली. गुरुवारची गर्दी असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात होते. त्यांचे जेवण सुरु असल्याने ही महिला एका झाडाखालील ओट्यावर बसली. तेव्हा एकनाथ महाराजांच्या शिष्याने तिच्याजवळ येऊन महाराजांनी खोलीत बोलाविल्याचे सांगितले. आत गेल्यानंतर महाराजांनी शरीर संबंध ठेवावे लागतील, असे सांगितले. यास विरोध केल्यानंतर व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी महिलेचा विनयभंग केला. तेव्हा आरडाओरडा केल्यामुळे शिष्याने दार उघडले. यावेळी मारहाण करुन गळा दाबण्याचा प्रयत्नही महाराजाने केल्याची तक्रार महिलेने येरमाळा पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एकनाथ महाराजावर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

म्हणे, पेढा दिला खायला अन्...दर्शनासाठी खोलीत गेल्यानंतर एकनाथ महाराजांनी या महिलेस शरीरसंबंधाची विचारणा केली. त्यास नकार दिल्यानंतर महाराजांनी मागच्या वेळी पेढा खायला दिल्यानंतर तु झोपली होती, तेव्हा आपण तुझ्यावर बलात्कार केला व त्याचा व्हीडिओही तयार केल्याचे सांगितले. हाच व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी महाराजाने दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद