उस्मानाबाद -कोरोनामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. असे असतानाही रोजगार हमी योजनेला गती येताना दिसत नाही. आजघडीला जिल्ह्यातील ६२२ पैकी सुमारे २७० ग्रामपंचायतीत एकही काम सुरू नाही. हे चित्र लक्ष्यात घेता जिल्हा प्रशासनाने 'रोहयो' अधिक गतिमान करण्याची गरज आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे काहींनी मुंबई, पुणे सारखी शहरे सोडून आपले गाव जवळ केले आहे. अशा अडचणीच्या काळात रोजगार हमी योजनेला गती देण्याचे शासनाचे आदेश आहेत. असे असतानाही जिल्ह्यात ही योजना गतिमान होताना दिसत नाही. ग्रामपंचायत आणि यंत्रणा मिळून जिल्ह्यातील ६२२ पैकी २७० ग्रामपंचायतीत एकही काम सुरू नाही. उर्वरित ग्रामपंचयातीतही प्रत्येकी एक अथवा दोन कामे सुरू आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. उपरोक्त चित्र पाहता, जिल्हास्तरीय यंत्रणेने कामे वाढविण्याच्या अनुषंगाने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
रोहयोवर शुन्य पैसे खर्च केलेल्या ग्रामपंचायती
98
तालुकानिहाय आकडेवारी
उस्मानाबाद 175
तुळजापूर। 257
उमरगा। 51
लोहारा। 43
भूम। 173
परांडा। 148