शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
2
JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
3
सीनिअर सिटिझन्ससाठी सुपरहिट आहे Post Officeची 'ही' स्कीम, ५ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ₹१२,३०,०००
4
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
5
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
6
"मी काळवीटाची शिकार केली नाही!" बिष्णोईच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल
7
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!
8
'केजीएफ' स्टार यश 'रामायण' मध्ये साकारणार रावणाची भूमिका, स्वत:च कन्फर्म करत म्हणाला...
9
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
11
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
12
१० व्या महिन्यात झाली डिलिव्हरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी झाली आई! सर्वांकडून अभिनंदन
13
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
14
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
15
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
16
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
17
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
18
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
19
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
20
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर

सेल्फी काढताना किल्ल्यातील बुरुजावरून तोल गेला;१०० फुटांवरून कोसळून नवविवाहितेचा मृत्यू

By चेतनकुमार धनुरे | Published: May 27, 2024 6:35 PM

नवविवाहितेचा लग्नाच्या आठव्या दिवशीच मृत्यू

नळदुर्ग (जि. धाराशिव) : तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (तूळ) येथील एक नवविवाहिता नळदुर्गच्या किल्ल्यातील बुरुजावर सेल्फी घेत असताना सुटलेल्या वाऱ्यात तोल जाऊन सुमारे शंभर फुटावरून खाली कोसळली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता घडली आहे.

तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (तूळ) येथील अमीर महेबूब शेख यांच्याशी तुळजापूर तालुक्यातील राकेल या गावातील त्यांच्या मामाची मुलगी निलोफर (२२) हिचा २० मे रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर हे नवदाम्पत्य सोबतीला भाचा इरफान कासीम शेख, मित्र सचिन भगवान सिरसाठ हे नळदुर्ग येथील किल्ल्यावर पर्यटनासाठी गेले होते. दरम्यान, सकाळी अकरा वाजता किल्ल्यातील उपल्या बुरूजावर हे सर्वजण फोटोसेशन करीत होते. निलोफर याही फोटो काढून घेत होत्या. बुरुजावरील वायव्य टोकाला थांबून त्या फोटो घेत असताना अचानक सोसाट्याचा वारा सुटला. यामुळे निलोफर यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या निलोफर यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता मयत झाल्याचे स्पष्ट झाले.

लग्नाच्या आठव्याच दिवशी गाठले मृत्यूने...मयत निलोफर यांचे २० मे रोजी लग्न झाले होते. विवाहाला आठही दिवस पूर्ण झाले नाही तोच मृत्यूने त्यांना गाठल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या बुरुजावरून त्या खाली पडल्या, तो उपल्या बुरुज सुमारे १०० फूट उंचीचा आहे. वर जाण्यासाठी ७७ पायऱ्या चढाव्या लागतात. अकस्मात आलेल्या वाऱ्याने निलोफरचा घात झाला.

टॅग्स :Selfieसेल्फीOsmanabadउस्मानाबादDeathमृत्यूAccidentअपघात