पावणे दोन वर्षात पोलिसांच्या भरोसा सेलमध्ये पतीचे पर स्त्री बरोबरचे संबंध असल्याचा संशय, पतीचे दारुचे व्यसन, पती चारित्र्यावर संशय घेतो, पती काम-धंदा न करता सतत मोबाईलवर वेळ घालवितो. यातूनच पती-पत्नीमध्ये सतत वाद होतात. या तक्रारी घेऊन महिला पोलीस ठाण्यात येतात. त्या ठिकाणी अदखलपात्र गुन्हा नोंद करुन त्यांना भरोसा सेलकडे पाठविण्यात येत असते. मार्च २०२० पर्यंत जिल्ह्यात महिला तक्रार निवारण केंद्र सुरु होते. या केंद्राकडे २०१९ मध्ये ४४६ तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी २२४ प्रकरणे आपसात तडजोडीने मिटली. १३६ प्रकरणे निकाली निघाली. एप्रिल २०२० ते नोव्हेंबर अखेर २९३ प्रकरणे भरोसा सेलकडे दाखल झाली होती. त्यातील ९० प्रकरणे आपसात तडजोडीने मिटली. ५ पोस्टेड वर्ग, १६ जणांना कोर्टात जाण्याची समज दिलेली आहे. ३५ प्रकरणे निकाली निघाली, १४७ प्रकरणे प्रलंबित आहेत.
९० प्रकरणांत समेट
भरोसा सेलमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीचा अभ्यास करुन तक्रारदारांचे समुपदेशन करण्यात आले. तक्रारदार व समोरील व्यक्तींचे म्हणणे ऐकून दोघांनाही जबाबदारीची जाणीव करुन देण्यात आली. २०२० नोव्हेंबर अखेर पर्यंत दाखल झालेल्या २९३ प्रकरणांपैकी ९० प्रकरणांमध्ये समझाेता केल्याचे भरोसा सेलकडून सांगण्यात आले.
भरोसा सेलकडे ग्रामीण भागातील महिला पती दारु पित असल्याच्या तक्रारी घेऊन येत आहेत. पती चारित्र्यावर संशय घेतो. तसेच मोबाईलवर टाईमपास करतो अशा तक्रारी महिला घेऊन येतात. नोव्हेंबर पर्यंत ९० प्रकरणात समझोता झाला आहे तर ३५ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.
प्रीती सावंत, पोलीस उपनिरीक्षक,
प्रभारी भरोसा सेल प्रमुख