उस्मानाबाद -दारू पिण्यास मज्जाव केल्याचा राग धरून ढाब्यावरील कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केल्याची घटना बाेरी येथे १६ मार्च राेजी घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध तुळजापूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर येथील बालाजी गायकवाड, सागर माेटे, नीलेश इंगळे या तिघांनी १६ मार्च राेजी २ वाजता बाेरी येथील एका ढाब्यावर गेले हाेते. दारू पिण्यास मनाई केल्याचा राग धरून कामगार सुरेंद्र कुमार यास संबंधित तिघांनी मिळून लाेखंडी गजाने बेदम मारहाण केली. तसेच ढाब्यावरील साहित्यांसह खिडकी ताेडून नुकसान केले. ‘तुम्ही ढाबा कसा चालवताय ते बघताे’ अशा शब्दात धमकावले. या प्रकरणी ढाबा मालक राजेश नागनाथ मस्के (रा. तुळजापूर) यांनी तुळजापूर पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून मारहाण करणाऱ्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.