अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र कठारे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ भारत गपाट, ग्रंथपाल माधव टिपरसे हे उपस्थित होते. प्रा.डॉ. भारत गपाट म्हणाले की, ग्रंथालयशास्त्राचे पितामह म्हणून ओळखले जाणारे डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा केला जातो. ग्रंथालयाच्या विकासात डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांचा फार मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथन यांची रुजविला, नंतर तो जोपासण्यासाठीही आपले संपूर्ण आयुष्य झिजविले. सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणदेखील किती आवश्यक असते, याचे महत्त्व डॉ. रंगनाथन यांनी सर्वप्रथम पटवून दिले. त्याकरिता ग्रंथालयाचा विकास, प्रसार होऊन देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची दारे विनामूल्य खुली करून द्यायला हवी, यासोबत वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी जनतेला प्रवृत्त केले पाहिजे, हा विचार डॉ. रंगनाथन यांनीच देशात रुजविला, असेही ते म्हणाले. यावेळी प्राचार्य डॉ. रवींद्र कठारे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ग्रंथपाल माधव टिपरसे, सूत्रसंचालन प्रा. महादेव उंदरे तर आभार प्रा. सुनील आवारे यांनी मानले.
जगदाळे महाविद्यालयात जागतिक ग्रंथालय दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:38 AM