गिरीश महाजन : 25 कोटींच्या कामांपूर्वी अधिकारी व पदाधिका:यांची बैठक
जळगाव, दि.27 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहरातील विकास कामांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र अजून 100 कोटींच्या निधीची मागणी केल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिवतीर्थ मैदानासमोरील जी.एम.फाउंडेशनच्या कार्यालयात त्यांनी सोमवारी पत्रकारांनी संवाद साधला.
अधिकारी व पदाधिका:यांची बैठक घेणार
जळगाव शहरातील विकासासाठी शासनाने 25 कोटींचा निधी दिला आहे. या निधीमध्ये होणा:या कामांसंदर्भात जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त तसेच लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक घेणार आहे. जळगाव शहरात अमृत योजनेंतर्गत काम होणार आहे. त्यावेळी पाईप लाईनसाठी खोदकाम होईल, त्यामुळे अमृत योजनेचे काम केल्यानंतर रस्त्याचे काम करावे का? असा दुसरा मतप्रवाह समोर येत आहे. त्या विषयावरदेखील चर्चा करण्यात येणार आहे.
नाथाभाऊंचा राष्ट्रवादी प्रवेश ही अफवा
माजी मंत्री एकनाथराव खडसे हे भाजपातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या सून या खासदार तर मुलगी जिल्हा बँक अध्यक्षा आहेत. त्यामुळे नाथाभाऊ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश ही निव्वळ अफवा आहे. सध्या कोण कुणाबाबत अफवा पसरविणार हे सांगता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
सीबीआयने चौकशी केलेल्या अधिका:यांशी संबंध गैर नाही
चोपडा येथील जिल्हा बँकेच्या शाखेतून जुन्या नोटा बदल केल्याप्रकरणी सीबीआयने जि.प.चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदू वाणी यांची चौकशी केली आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी नंदू वाणी यांचे कुणासोबत संबंध आहे हे जगजाहीर असल्याचे विधान केले होते, याबाबत विचारले असता, त्यांनी अधिकारी यांच्यासोबत संबंध असणे गैर नसल्याचे स्पष्ट केले. लोकप्रतिनिधी म्हणून अनेक अधिकारी व कर्मचा:यांशी संबंध येत असतात. सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे चौकशी नंतर खरा प्रकार काय आहे, ते समोर येणारच आहे. ज्याने चूक केली आहे त्याला शिक्षा झालीच पाहीजे असे परखड मत त्यांनी नोटबदली प्रकरणाबाबत व्यक्त केले.
भादली दरोडा लवकरच उलगडणार
भादली येथील दरोडय़ातील मारेक:यांना अटक करण्यात पोलिसांना अजूनही यश आलेले नाही. आजच आपण पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली. गावातील नागरिक माहिती देत नसल्याने पोलिसांची अडचण आहे. मात्र पोलिसांना काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असून लवकरच या दरोडय़ाचा उलगडा होऊन मारेक:यांना अटक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.