ऑनलाईन लोकमत विशेष /आबा सोनवणे
साक्री, जि.धुळे, दि.4- ‘आरोग्यम धनसंपदा’ असे संस्कृतमध्ये वचन आहे. जीवन जगत असताना पैसे, धन, संपत्ती नसली तरी चालेल परंतू उत्तम आरोग्य असायला हवे. श्रीमंती मिळवणारे किंवा भोगणारे जगात अनेक गर्भश्रीमंत आहेत, परंतू त्यांना कोणालाही आयुष्याची 100 वर्ष पूर्ण करता आलेली नाही. याला कारण पैसे मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलेले असते.
परंतू खेडेगावात राहून शेती व्यवसाय करुन संपूर्ण कुटुंबाची देखरेख करत त्यांनाही मार्गाला लावणारे नारायण देवराव क्षीरसागर यांनी 3 मे रोजी आपला 100 वा वाढदिवस साजरा केला. 80 टक्के समाजकारण व 20 टकके राजकारण करणा:या शिवसेनेने यानिमित्ताने त्यांचा यथोचित सत्कार केला. शिवसेना प्रमुख विशाल देसले, युवा सेनेचे उपतालुका प्रमुख अमोल क्षीरसागर, बहिरम देव उत्सव समिती, जय ज्योती जय क्रांती मित्र मंडळ यांनी त्यांचा सत्कार केला. नारायण क्षीरसागर यांचा जन्म 3 मे 1917 चा आहे. दररोज पहाटे 5 वाजता उठणे, अंगण झाडणे, त्यानंतर आंघोळ, परिपाठ करणे, वर्तमानपत्र न चुकता वाचणे हा त्यांचा नित्यक्रम आहे.
आयुष्यभर कोणतेही व्यसन नाही, सकारात्मक विचारसरणी, शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारचे जेवण ते घेतात, त्यांना तीन मुले मोठा मुलगा भदू नारायण क्षीरसागर, मुरलीधर व अजरून क्षीरसागर दोन मुले शेती करतात तर भटू क्षीरसागर यांचे वय आज 68 वर्ष आहे.
आजच्या धकाकीच्या जीवनात जरी त्यांचे आयुष्य कमी खर्ची पडले असले तरीही पूर्वीच्या काळातील सकस आहार, कष्ट करण्याची प्रवृत्ती, सकारात्मक विचारसरणी हीच खरी त्यांच्या निरोगी जीवनाची गुरुकिल्ली ठरली आहे. त्यासोबत गेल्या 40 वर्षापासून वडीलांची सेवा करणारे मुरलीधर क्षीरसागर, त्यांचा सुपुत्र प्रदिप क्षीरसागर व त्यांच्या कुटुंबियांवर ही याचे श्रेय जाते. नारायण क्षीरसागर यांनी आपल्या कुटुंबाच्या योगदानाने आपल्या आयुष्याची 100 वर्ष पूर्ण करुन समाजाला निरोगी जीवनाचा व आदर्शकुटूंब व्यवस्थेचा धडा घालून दिला आहे.