लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पंतप्रधान घरकुल योजनेतून सर्वसामान्य व्यक्तीचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी लाभार्थ्यांना घरकुल योजनेतून अर्थसहाय्य केले जाते़ २०१६-१७ ते २०१८-१९ वर्षात ११ हजार ६४५ लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाली आहे़ या योजनेतून शिरपूर तालुका अव्वल तर शिंंदखेडा तालुक्यातील सर्वात कमी लाभार्थी आहेत़ आर्थिकदृष्या मागासलेल्या नागरिकांचे राहणीमानात बदल होऊन त्यांना हक्कांचे घर मिळण्यासाठी केंद्र व राज्यसरकार घरकुल बांधण्यासाठी अर्थसहाय्य करीत आहे़ घरकूल लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून एक लाख, कर्ज आधारित व्याज अनुदान देण्यात येते तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पउत्पन्न घटकांसाठी परवडणाºया घरांची निर्मितीसाठी केंद्र शासनाकडून अनुदान तर राज्य शासन एक लाखांचे अनुदान देणार आहे़ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास केंद्र शासन दीड लाख तर राज्य शासनाकडून एक लाखापर्यंत अनुदान दिले जात़े त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरांचे स्वप्न या योजनेतून पुर्ण होत आहे़ ग्रामीण भागासह शहरातील झोपडपट्टयांचे पुनर्विकास होण्यासाठी घरकुल कर्ज, संलग्न व्याज, अनुदान देण्यात येत आहे़ जिल्ह्यातील पंतप्रधान घरकुल योजनेचे लाभार्थी पंतप्रधान घरकुल आवास योजनेसाठी सन २०१६-१७ ते २०१८ -१९ या वर्षासाठी प्रशासनाकडून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रनेला ९८.३५ टक्के उदिष्ठे देण्यात आले होते़ त्यात धुळे तालुक्यासाठी २५६५, साक्री ६१५१ , शिरपूर ६६५१ , शिंदखेडा २३३४ असे १७ हजार ७०१ उदिष्टे होते़ त्यात जानेवारी ते डिसेबरपर्यत धुळे तालुक्यात १९३४, साक्री ३९३६, शिरपूर ४२५१ शिंदखेडा १५२४ असे चारही तालुक्यातून ११ हजार ६४५ घरकुल बांधण्यात आले़ सहा हजार घरकुल अद्यापही अपूर्णचंजिल्ह्यात घरकुल योजनेसाठी प्रशासनाकडून १७ हजार ७०१ घरकुलांचे उदिष्ठे देण्यात आले होते़ मात्र काही लाभार्थ्यांनी वेळत घरकुलांचे काम पुर्ण न केल्याने धुळे तालुक्यातील ६२२, साक्री २२१५, शिरपूर २४०० शिंदखेडा ८१० अशी ६ हजार ४७ घरकुल अद्यापह अपुर्ण आहेत़ मंत्र्यांचा तालुका घरकुल योजनेत पडला मागेपंतप्रधान घरकुल याजेनेतुन नागरिकांना हक्कांचे घर मिळावे यासाठी राज्यात राबविण्यात येणारी या योजनेत शिंदखेडा तालुक्यासाठी २३३४ घरकुलांचे उदिष्ठे देण्यात आले होते, मात्र या योजनेत १५२४ घरकुलांचे काम पुर्णत्वास आले आहे तर ८१० घरकुलांचे काम अद्याप अपुर्णचं आहे़ त्यामुळे सरकाच्या कल्याणकारी योजनेत शिंदखेडा तालुका मागे पडला आहे़ आवास योजनेतून हक्काचे घरकुल़़जिल्ह्यात पंतप्रधान घरकुल योजनेतुन घरकुल बांधण्यात येत आहे़ या योजनेतुन लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुलाच्य कामानुसार टप्या-टप्यात रक्कम वर्ग करण्यात येत आहे़ लाभार्थ्यांना घरकुलाचा मोबदला मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घरकुलाचे काम सुरू करून पुर्ण करावे़ -बी़एम़मोहन (प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास योजना, धुळे)
जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेचे ११ हजार ६ लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:20 PM