ऑनलाईन लोकमतधुळे, दि. 14 - शिंदखेडा शहरातील एस़एम़एफ़एस गल्र्स हायस्कूलच्या संगणक कक्षाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी संगणकाचे 12 मॉनिटरसह 60 हजार 500 रूपयांचे साहित्य चोरून नेले आहेत़ ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली़ अज्ञात चोरटय़ांनी 9 जून रोजी दुपारी 12़ 30 ते 13 जुने रोजी सकाळी 8़20 वाजेदरम्यान संगणक कक्षाचे कुलूप तोडून मॉनिटरसह प्रोजेक्टर, इन्व्हर्टर व दोन कॅमेर चोरून नेल़े याप्रकरणी हायस्कूलचे कर्मचारी भूषण शहा यांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
शिंदखेडय़ातील गल्र्स हायस्कूलमधून संगणकाचे 12 मॉनिटर लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2017 1:12 PM