ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 23 - जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतक:यांसाठी फलदायी असताना 13 प्रकरणे अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आह़े दरम्यान, 1 डिसेंबर 2015 ते 30 नोव्हेंबर 30 नोव्हेंबर 2016 या कालावधीत 52 प्रकरणे प्राप्त झाली आहेत़ त्यात 23 प्रकरणे मंजूर आहेत़ उर्वरीत प्रकरणांमध्ये क्षेत्रीय स्तरावर 9 प्रकरणे प्रलंबित आहेत़ 7 प्रकरणे नामंजूर झाली आहेत़ शेती करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे ब:याच शेतक:यांचा मृत्यू ओढवतो़ काही शेतक:यांना अपंगत्व येत़े घरातील कत्र्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन बंद होवून अडचणीची परिस्थिती निर्माण होत़े अशा अपघातग्रस्त शेतक:यास अथवा त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता कोणतीही स्वतंत्र्य विमा योजना नसल्यामुळे शासनाने राज्यात शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना 2005-06 या वर्षापासून सुरू केलेली आह़े या योजनेचे नाव आता ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ असे करण्यात आलेले आह़े शेतक:यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी विमा संरक्षणासाठी काही मोजक्या स्वरुपाचे अपघात समाविष्ट केलेले आहेत़ त्यात प्रामुख्याने रस्ता अपघात, बुडून मृत्यू, विजेचा धक्का, वीज पडणे, नक्षलवादी हल्ला, उंचावरुन पडणे, सर्पदंश, खून, दंगल आणि इतर अपघातांचा यात समावेश आह़े शेतक:याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना 2 लाख भरपाई मिळू शकत़े याशिवाय अपघातामुळे दोन डोळे निकामी होणे, दोन अवयव निकामी होणे, एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी प्रत्येकी 2 लाखांची नुकसान भरपाई मिळू शकत़े याशिवाय अपघातामुळे एक डोळा निकामी होणे आणि एक अवयव निकामी होणे यासाठी प्रत्येकी 1 लाखांची नुकसान भरपाई मिळू शकत़े
धुळे जिल्ह्यात शेतकरी अपघात विम्याचे 13 प्रकरणे प्रलंबित
By admin | Published: April 23, 2017 6:43 PM