ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.1 - सुरत- नागपूर महामार्गावरील आनंदखेडे शिवारात शुक्रवारी पहाटे लक्झरी बस उलटून झालेल्या अपघातात 13 प्रवासी जखमी झाले आहेत़ त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आह़े
नाशिकहून सुरतकडे भरधाव वेगाने जाणारी शुभम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस ( जीजे 5-एव्ही 8502) शुक्रवारी पहाटे 4़30 वाजेच्या सुमारास आनंदखेडे गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ उलटली. बस उलटल्याने 13 प्रवासी जखमी झाल़े तसेच बसचेही नुकसान झाल़े बसवरील मालही रस्त्यावर पडला होता़ जखमींमध्ये शरीफ शेख अजिज (40), मालूबाई नारायण टिकार (55), सतीश नारायण टिकार (35), आशाबाई तीर्थराज टिकालकर (25), तीर्थराज विष्णू उधळकर (28), तोताराम काशीराम मिस्तरी (50), प्रकाश पुंडलिक राठोड (30), कैलास पोपट जाधव (28), मुद्दसर अफसर हुसेन (30), अब्दुल सलीम गुलाम मुर्तजा (47), नाजनित अब्दुल सादीक (20), अर्चना संतोष रणचौरे (30) व तुळशीराम खर्डे (70) यांचा समावेश आह़े त्यांना तत्काळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आह़े याबाबत शरीफ शेख अजिज याच्या माहितीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आह़े