शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

13 भावंडांना वयाच्या साठीनंतरही एकमेकांचा लळा

By admin | Published: May 07, 2017 5:03 PM

कुसुंबा : पूर्णत: निव्र्यसनी कुटुंब, बहिणीच्या पंच्याहत्तरीला सर्वाची हजेरी

 ऑनलाईन लोकमत विशेष /रणजित शिंदे  

कुसुंबा, जि. धुळे, दि.7 - अलीकडे एकदा लग्न झालं की मुले आपल्या आई-वडिलांना, भाऊ-बहिणींना विसरून जातात. परंतु वयाचे 60 वर्ष पूर्ण केल्यानंतरही सख्ख्या 13 भाऊ-बहिणींना एकमेकांशी लळा कायम असल्याचे धुळे येथील कुसुंबा येथे झालेल्या एका कार्यक्रमात दिसून आले. या वयाच्या साठी पार केलेल्या 13 भावंडांनी एकत्र येत केसरताई बारीकराव शिंदे या बहिणीची वयाची पंचाहत्तरी अगदी धुमधडाक्यात साजरी केली. 
या उत्साहात कुटुंबातील सर्वात थोरली 84 वर्षाची बहिणही सहभागी झाली होती. नुकतेच 5 मे रोजी कुसुंबा येथील गल्ली नं.3 मध्ये केसरताईच्या घरी एकाचवेळी उपस्थित होते. सर्वानी एकत्र येऊन पंचाहत्तरी साजरी करत आंब्याचा रस आणि पुरणपोळीच्या जेवणाचा आनंदही लूटला.
यावेळी माहेरवासीन द्वारकाबाई उत्तम भामरे (वय.84, कापडणे), जावतराबाई शांतीलाल भदाणे (वय 73, निमखेडी), जिजाबाई भाऊराव नेरपगार (वय 71, बहाळ), वत्सलाबाई माणिक देसले (वय 69, वैजाली), विमलबाई गुणवंत पंडित (वय 67, दहिगाव), कमलबाई मधुकर शिरसाठ (वय 61), सुमनबाई रमेश निकम (वय 58, बोराडी), वावडे येथील सेवानिवृत्त विस्तार अधिकारी पंढरीनाथ दगडू ठाकरे (82), रघुनाथ ठाकरे (80), एकनाथ ठाकरे (72), सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी धनराज ठाकरे (65), उपप्राचार्य सुरेश दगडू ठाकरे ही तेराही भावंडे उपस्थित होती. यांच्यासह मुली, जावई, नातू, सूना, नातेवाईकही उपस्थित होते.
पूर्ण कुटुंब निव्र्यसनी 
केसरताईंचे वडिल दगडू झुगरू ठाकरे हे वावडे (ता.अमळनेर, जि.जळगाव) जिल्ह्याचे होते. त्यांनी वावडे गावाचे 15 वर्ष सरपंच पद भूषविले होते. त्यांच्या पत्नी कासूबाई दगडू ठाकरे यांनी मुलांना व्यवस्थित संस्कार देऊन संगोपन केले. दोघेही सध्या हयात नाहीत. हे संस्कारीत कुटुंब पूर्णत: निव्र्यसनी आहे. तसेच सर्व नातू, नात हे उच्च शिक्षित व उच्च पदावर  आहेत. पंचक्रोषित त्यांची आदर्श परिवार म्हणून गणना केली जाते.
 
आम्ही पूर्वीपासूनच एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतो. वयाचे साठ वर्ष पूर्ण केल्यानंतरही सर्वाचे आरोग्य ठणठणीत आहे. लहानपणापासून एकमेकांना असलेल्या लळा कायम ठेवण्यात आला आहे.
-केसरताई शिंदे, कुसुंबा