शिरपूर, दि.8- गेल्या 25 वर्षापासून तालुक्यातील अनेर अभयारण्य क्षेत्रात असलेल्या 14 पाडे मूलभूत सुविधांपासून वंचित आह़े विशेषत: तेथे शाळा वर्गखोल्या बांधकामासाठी पैसा मंजूर असतांना देखील केवळ वनविभागाने परवानगी नाकारल्यामुळे 26 लाखांचा निधी परत गेला आह़े
तालुक्यातील सातपुडय़ाच्या रांगेत असलेल्या खुटमळी, टिटवापाणी, पिरपाणी-चिलारे, कोईडोकीपाडा-सावेर, पिपल्यापाणी-रोहिणी, चिंचपाणी-महादेव दोंदवाडे या ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या 6 पाडे पक्षीय अभयारण्य क्षेत्रात येत असल्यामुळे हे पाडे भौतिक सुविधांपासून वंचित आह़े याशिवाय मालपूरपाडा-मालकातर, प्रधानदेवी-गु:हाळपाणी, शेकडय़ापाडा-खैरखुटी, भूपेशनगर-आंबे, सोज्यांपाडा, सातपाणी, न्यु सातपाणी-म़दोंदवाडे, कोवपाटपाडा-हिगांव या 8 पाडय़ांवर देखील भौतिक सुविधा पोहचलेल्या नाहीत़ त्या पाडय़ांवर जाण्यासाठी रस्ते नाही, खडखळ रस्त्यातून वाट काढत जावे लागत़े चारही बाजूनी जंगल असलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या आदिवासी ग्रामस्थांच्या अडचणी वाढल्या आहेत़ अधिका:यांच्या उदासीनतेमुळे या पाडय़ांवर जाण्यासाठी रस्ते नाही, वीज नाही, पाण्याचा प्रश्न कायम आह़े ग्रामस्थ किती हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत, याचे प्रत्यक्ष दर्शन घडल्यानंतर कळत़े
पक्षीय अभयारण्य क्षेत्रातील 6 पाडय़ांना वनविभागाने परवानगी दिल्यास तेथील आदिवासींना भौतिक सुविधांचा लाभ मिळू शकतो़ तसेच अन्य 8 पाडे वनहक्क कायदा अंतर्गत तेथील सुविधांचा प्रश्न सुटू शकतो परंतु त्यासाठी प्रशासनाकडून दाद मागितली जाईल़ याबातचा प्रस्ताव देखील वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहेत़