शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अवघड क्षेत्रातील १४ शाळा भरतात झोपडीत

By admin | Published: July 14, 2017 1:17 AM

तत्कालीन सीईओंनी सुरुवातीला ३३ शाळांना दिली मंजुरी, मात्र शेवटी १९ शाळांना वगळले

सुनील साळुंखे । लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यात अवघड क्षेत्रातील ३३ जिल्हा परिषद मराठी शाळांना तत्कालीन सीईओंनी सर्वेक्षण करून मंजुरी दिली होती़ परंतु त्यामधून १९ शाळा कुठलाही सारासार विचार न करता वगळण्यात आल्यामुळे आता फक्त १४ शाळांना मंजुरी देण्यात आली आहे़ त्यामुळे डोंगर-दºयातील व त्या शाळांना ये-जा करण्यासाठी रस्ता, भौतिक सुविधा नसतानाही वगळण्यात आलेल्या १९ शाळांमधील शिक्षकांवर अन्याय झालेला आहे़ वगळण्यात आलेल्या शाळा कोणत्या कारणाने रद्द केल्या, त्याची फेर चौकशी व्हावी तसेच त्या शाळा पात्र केल्या नाही तर कोर्ट आॅफ कन्टेन केला जाईल, असा इशारा धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने सीईओंना दिलेल्या पत्रात नमूद केला आहे़जून २०१७ मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी तालुक्यातील अवघड क्षेत्रातील शाळांचा सर्व्हे करून ३३ शाळांची यादी मंजूर केली होती़ त्यात या तालुक्यातील अंबडपाडा-सामºयापाडा, एकलव्यपाडा-बोराडी, धाबादेवीपाडा- सलईपाडा, विद्यानगर -टेंभेपाडा, वरचे रोषमाळ-गधडदेव, मालपुरापाडा-मालकातर, नवादेवी, उमरपाडा-चाकडू,  धरमपुरापाडा-गधडदेव, विकलापाडा- मालकातर, इंगन्यापाडा-  फत्तेपूर फॉरेस्ट, रोषमाळ, रामपूर, कढईपाणी- उमर्दा, प्रधानदेवी - उमर्दा, साकळीपाडा, कंज्यापाणी, बिकानेर- हाडाखेड, कुंडीपाडा-खैरखुटी, शेकड्यापाडा-खैरखुटी, काकडमाळ,  थुवानपाणी-गुºहाळपाणी,  निशानपाणी, पिपल्यापाणी- रोहिणी, नोटूपाडा-हिगांव, कौपाटपाडा-हिगांव, नवापाडा  -लाकड्या हनुमान, टिटवापाणी-चिलारे,  खुटमळी-चिलारे, पिरपाणी-चिलारे, कोईडोकीपाडा- सावेर, सातपाणीपाडा-महादेव दोंदवाडे, न्यू सातपाणी-महादेव दोंदवाडे या शाळांचा समावेश होता़ या गावातील शाळा ये-जा करण्यासाठी मुख्य रस्त्यापासून ४-५ कि.मी. अंतरावर असून तेथे जाण्यासाठी पायवाटेने जावे लागते़ कुठलेही वाहन जात नाही, खडकाळ रस्ता, नदी-नाल्यातून जावे लागते. पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटतो, विजेची सोय नाही तसेच भौतिक सुविधांपासून तेथील ग्रामस्थ वंचित राहतात़ अशाही परिस्थितीत तेथे झोपडीवजा घरात ज्ञानदानाचे काम केले जाते़ अवघड क्षेत्रातील शाळा सर्वसाधारणपणे तालुका मुख्यालयापासून दूर, दळणवळणाच्या दृष्टीने त्या शाळेत अथवा गावात पोहचण्यास सोईसुविधा नाहीत, दुर्गम व डोंगराळ भागातील गावे तसेच काम करण्यास प्रतिकूल असलेली गावे ही अवघड क्षेत्र म्हणून निश्चित केली जातात असा अध्यादेश आहे़ या अवघड क्षेत्रातील शिक्षकांना बदली करतेवेळी प्राधान्य दिले जाते़ किमान  ३ वर्षे त्या भागात नोकरी केली  अशा शिक्षकांना अधिक लाभ होतो, भविष्यात या शिक्षकांना आर्थिक व इतर लाभदेखील मिळू शकणार आहेत़ पेसा अंतर्गत आदिवासी भागातील शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी दिली आहे, त्याप्रमाणे भविष्यात या शिक्षकांनादेखील लाभ होऊ शकणार आहे़त्यामुळे आता फक्त या तालुक्यातील १४ शाळांतील शिक्षकांनाच लाभ मिळणार आहेत़ त्यात वरचे रोषमाळ-गधडदेव, मालपुरापाडा- मालकातर, कढईपाणी- उमर्दा, प्रधानदेवी-उमर्दा, साकळीपाडा, कंज्यापाणी, थुवानपाणी- गुºहाळपाणी, निशानपाणी, पिपल्यापाणी-रोहिणी, टिटवापाणी-चिलारे,  खुटमळी-चिलारे, पिरपाणी-चिलारे, कोईडोकीपाडा- सावेर,  न्यू सातपाणी-महादेव दोंदवाडे या शाळांचा समावेश आहे़उर्वरित १९ शाळांना वगळण्यात आल्यामुळे त्या शाळेतील शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे़ त्याही शाळा डोंगरदºयात असताना नेमके कोणत्या कारणामुळे वगळ्यात आल्या त्याचा खुलासा करावा, अशा आशयाचे निवेदन सीईओंना देण्यात आले आहे़ मात्र अद्यापपर्यंत त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही़शासनाच्या धोरणामुळे आदिवासी मुलांची शिक्षणाची गैरसोय नको म्हणून शाळांना मंजुरी दिली जाते़ ग्रामस्थांच्या मदतीनेच झोपडीवजा खोली मुलांसाठी सजली जाते़ मुले अ-ब-क-ड़़़ गिरवू लागतात, गाणी म्हणू लागतात, त्याच झोपडीत कुटुंबांची रेलचेल़़़ कोंबड्यांची पिलावळ तर कधी सापाचे दर्शनही घडते़  आज ना उद्या आपल्या गावात शाळेची टुमदार इमारत होईल असे स्वप्न साºयांचेच, परंतु ८-१० वर्षे झाली तरी या मुलांना दिवस मात्र झोपडीतच काढावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले़ दहा बाय दहाच्या खोलीत पहिली ते चौथीची मुले, गुरेढोरांचा कुबट वास, ऊन-पावसाची परिस्थिती, त्यातच मुलांना गोणपाटाची स्वच्छतागृहे तग धरून आहेत़ पाण्याची पुरेसी सोय नाही़ खिचडी शिजविण्याची जागा नाही़ प्रत्येक शाळेत भौतिक सुविधा पुरविण्याच्या जाहिराती पाहून धन्य वाटते, परंतु असे वास्तवदेखील आहे हे कळाल्यावर मात्र शासन किती निष्ठूर आहे याची जाणीव होते़ पाऊस आला म्हणजे काय हाल होत असतील कोण जाणे! तेथील गुरूजनांची होणारी परवड लक्षात घेण्याजोगी आहे़ शाळा खोली, स्वच्छतागृह, पाण्याची सुविधा, स्वयंपाकगृह आदी भौतिक सुविधा नसल्याने शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होताना दिसते़ आदिवासी मुलांना गुणवत्तेचा आग्रह धरण्याअगोदर अशा शाळांना भौतिक सुविधा द्याव्यात़ जेणेकरून मुलांचे मन रमणे शक्य होईल अन्यथा मुलांचे भविष्य अंधारातच राहील व तो दोष-पाप हे शासनाच्या माथी आल्याशिवाय राहणार नाही़ झोपडीत शाळाअनेर अभारण्य क्षेत्रात शाळा बांधकामास परवानगी मिळत नसल्यामुळे तब्बल ७-८ वर्षांपासून त्या परिसरातील जि़प़च्या शाळा आजही झोपडीवजा खोलीत शाळा भरतात. त्यात पिरपाणी, पिपल्यापाणी, सोज्यापाडा, न्यू सातपाणी, खुटमळी, भूपेशनगर, प्रधानदेवी, कौपाटपाडा आदींचा समावेश आहे़१० बाय १० च्या खोलीत पहिली ते चौथीची मुले, गुरेढोरांचा कुबट वास, ऊन पावसाची परिस्थिती, त्यातच मुलांना गोणपाटाची स्वच्छतागृहे तग धरून आहेत़ पाण्याची पुरेसी सोय नाही़ खिचडी शिजविण्याची जागा नाही, अशा एक ना अनेक समस्या आहेत.