धुळे : चौदाव्या वित्त आयोगा अंतर्गत ग्रामपंचायतींच्या सर्वांगिण विकासासाठी शासनातर्फे पहिल्या हप्तयात २७ कोटी ४ लाख ३२ हजार रुपये एवढा निधी प्राप्त झाला होता.त्या पैकी मार्च अखेर पर्यंत फक्त २४.४१ टक्के एवढाच निधी खर्च झाला आहे. हा निधी खर्च करण्यात धुळे तालुका आघाडीवर आहे. तर शिंदखेडा तालुका पिछाडीवर आहे. दरम्यान अद्याप पहिल्याच हप्त्यातील ७५ टक्के निधी खर्चाविना पडून असतांना आता दुसऱ्या हप्त्याचे २७ कोटी चार लाख ३२ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये जिल्हा परिषदेला चार ही तालुक्यांसाठी २७ कोटी चार लाख ३२ हजार रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला होता. जिल्हा परिषद प्रशासनाने लोकसंख्येच्या प्रमाणात नुसार ग्रा.पं.निहाय तत्काळ हा निधी वर्ग केला आहे. मात्र मार्च अखेर पर्यंत पहिल्या हप्त्यातील प्राप्त निधी पैकी फक्त सहा कोटी ६० लाख २३ हजार १९४ रुपये खर्च झाला. तर २० कोटी ४४ लाख नऊ हजार रुपयांचा निधी खर्चाशिवाय पडून आहे.
१४वा वित्त आयोग; २४.४१ टक्के निधी खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 10:20 PM