धुळे : मनमाड - धुळे -इंदूर रेल्वेमार्गासाठी सहा महिन्यात प्रशासकीय आणि तांत्रिक बाबी पूर्ण करून घेण्याचे काम रेल्वे मंत्रालयाने प्रामुख्याने हाती घेतले असून त्यासाठीच यंदाच्या अर्थसंकल्पात 150 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली.मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्ग साकारण्यासाठी रेल्वे मंत्रालयासोबत जहाज बांधणी मंत्रालय संयुक्त करार करून निम्मा निम्मा अर्थात 5 हजार कोटी शिपिंग मंत्रालय आणि 5 हजार कोटी रेल्वे मंत्रालय खर्च उचलणार आहे. याबाबतचे प्राथमिक टप्पे पूर्ण झाले असून, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व सुरेश प्रभू यांच्या मंत्रालयांनी त्यावर शिक्कामोर्तबही केले आहे. दरम्यान, शिपिंग मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय संयुक्तरित्या या मार्गाचा सव्र्हे करून त्यांचा सविस्तर डीपीआर अर्थात दैनंदिन प्रकल्प अहवाल सादर करतील. मग शिपिंग आणि रेल्वे मंत्रालयात संयुक्त करार होईल आणि त्यानंतर त्यास नीती आयोगाची मंजुरी मिळवून अखेर केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी घेण्यात येणार आहे. यासर्व प्रक्रियेस साधारत: सहा महिन्यांचा कालावधी लागेल, तो र्पयत या रेल्वेमार्गाच्या प्रशासकीय आणि तांत्रिक बाबी पूर्ण करून घेण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने 150 कोटींची तरतूद केली आहे. केंद्र शासनाने 2017-18 सालच्या अर्थसंकल्पात देशभरात निर्माण करण्याच्या रेल्वेमार्गासाठी विशेष तरतूददेखील केली असून त्यात प्राधान्याने मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाचा समावेश असल्याचे डॉ.सुभाष भामरे यांनी सांगितले. रेल्वे व जहाज बांधणी मंत्रालयाचा संयुक्त प्रोजेक्टजवाहरलाल नेहरू पोर्ट रेल्वेमार्गाशी जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट अंतर्गत या रेल्वे मार्गाच्या कामास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ.सुभाष भामरे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि केंद्रीय जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहे.
प्रशासकीय बाबींसाठी 150 कोटी
By admin | Published: February 03, 2017 11:48 PM