लोकमत न्यूज नेटवर्कसोनगीर : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला असून एखाद दोन किरकोळ स्वरूपाचे पाऊस वगळता जुलै महिन्याच्या सुरवातीला मंगळवारी दुपारी सोनगीर सह परिसरात हंगामातील पहिल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपुन काढले मात्र सोनगीर ची पाणी टंचाई भिषण तीव्रता कमी होईल यासाठी आणखी एखाद दोन मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे, या वर्षीच्या तापत्या उन्हा मुळे सोनगीर गावासाठी पाणी पुरवठा करणारे जवळपास सर्वच पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्याने ग्रामस्थांना सध्या काही भागात पंधरा तर काही भागात सोळा दिवसा आड पाणी पुरवठा केला जात आहे यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाई ला समोर जावं लागतं आहे गेल्या चार वर्षांपासून सतत दुष्काळामुळे ग्रामस्थ तीव्र पाणी टंचाईला तोंड देत आहेत. यंदा देखील फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला सात दिवसाआड मिळणारे पाणी आता जुलै महिना सुरू होताच १६ दिवसानंतर मिळू लागले आहे.पावसाळा सुरू होऊन महिना होण्यात येईल मात्र येथील धरण, तलाव, बंधारे मध्ये पाणी नाही. सध्या महिन्यात फक्त दोन दिवस पाणी मिळत आहे. सोनगीर साठीची पाणी टंचाई कायम स्वरूपी दुर व्हावी म्हणुन गेल्या चार ते पाच वर्षात ग्रामस्थ तर्फे जिल्हा प्रशासन सह, लोकप्रतिनिधी विविध उपाय सुचवून निवेदन देण्यात आली यासाठी ग्रामस्थांनी उपोषण, आंदोलन आदी केलीत मात्र फक्त आश्वासन याचा पलीकडे ग्रामस्थांचा हाती फारस काही लागलं नाही ग्रामपंचायत आपल्या स्तरावर ग्रामनिधी खर्च करून तात्पुरता उपाययोजना करून तेवढ्या पुरता पाणी टंचाई निभावून नेण्याचा प्रयत्न करत असते मात्र प्रशासनाने कायम स्वरूपी पाणीटंचाई दूर होईल यासाठी एखाद योजना न दिल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करतात. गतवर्षी ग्रामपंचायतीने डॉ.पारेख यांचा शेतातील विहीर अधिग्रहित केली होती. त्यांनी विनामूल्य पाणी देऊन पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत केली होती. मात्र यावर्षी उन्हाळ्याचा सुरवातीचा काही काळ च या विहिरीच पाणी मिळाले., सध्या अर्जुन मराठे यांचा शेतात असलेल्या ग्रा.पं.च्या मालकीचे तसेच उद्योजक अतुल देशमुख आणि स्वखर्चाने करून दिलेले बोअरवेल व जामफळ धरणात असलेल्या विहिरीच्या माध्यमातून पाणी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सुमारे ३० हजार लोकसंख्या असलेल्या गावास तीव्र टंचाई जाणवत आहे. दरम्यान धरणात वेगवेगळ्या भागात तात्पुरता दोन नवीन खोदलेल्या शेवडीमधून पाणी मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्या मधून देखील दिलासा मिळत नाही. दरम्यान पाणी टंचाईबाबत लोकप्रतिनिधी फारसे गंभीर दिसत नाहीत. येथील ग्रा.पं.च्या १७ सदस्यांपैकी केवळ दोन-चार सदस्य पाण्यासाठी उठाठेव करताना दिसतात. दरम्यान १५ दिवसातून एक वेळा पाणी मिळत असल्याने काही ग्रामस्थ खाजगी पाणी वितरकांचा आधार घेतांना दिसून येतात. यासाठी गरजेनुसार वितरकाकडून पाणी विकत घेतात पाच हजार लिटर साठी ६०० रुपये तर दोन हजार लिटर साठी २५० रुपये तर एक हजार साठी दीडशे रुपये या प्रमाणे पाणी खरेदी करावे लागते. त्यासाठी वितरकास एक दिवस आधी सांगावे लागते. काहींची आर्थिक परिस्थिती बरी असल्याने त्यांना विकत चे पाणी शक्य होते. मात्र ज्यांना शक्य नाही ते मिळेल तेथून पाणी आणण्यासाठी भटकंती करतात. दरम्यान पाणी टंचाई काही प्रमाणात दूर करण्यासाठी ग्रा.पं.ने ठराव करून पंचायत समितीकडे वीस टँकर पाणी पुरवावे, अशी मागणी केली आहे मात्र पं.स. प्रशासनाने त्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
भरपावसाळ्यात १६ दिवसाआड पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 12:13 PM