लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेच्या तिसºया टप्प्यात (२०१७-२०१८) जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागातर्फे ४२९ कामे केली जाणार होती. ही कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले होते. मात्र, जि.प.च्या लघू सिंचन विभागाच्या अखत्यारित असलेल्या एकूण ४२९ कामांपैकी १७ जूनपर्यंत २६७ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित १६२ कामे प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २०१७-२०१८ या वर्षासाठी जिल्हयात कामे करण्यासाठी ९५ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागातर्फे ४३१ कामे केली जाणार होती. त्यात ४२९ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या कामांमध्ये नवीन साठवण बंधारे व त्यांची दुरूस्ती कोल्हापुरी बंधार, पाझर तलाव पुरर्भरण, तलाव दुरूस्ती, गाव तलावातील गाळ काढणे आदी कामांचा समावेश होता. दरम्यान, प्रलंबित राहिलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी शनिवार, सकाळी ११ वाजता लघू सिंचन विभागाच्या अभियंता व उपअभियंत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पाच पोकलॅण्ड मशीन प्राप्त तिसºया टप्प्याचे कामे पूर्ण करण्याचे जून २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, अद्याप जिल्हयातील १६२ कामे ही अद्याप प्रलंबित राहिली आहे. प्रलंबित राहिलेल्या कामांचे कामे सुरू आहे. जिल्ह्यात प्रलंबित राहिलेल्या नाला खोलीकरणाच्या कामासाठी पाच पोकलॅण्ड मशीन प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसहभागाचे आवाहन नाला खोलीकरणाच्या कामासाठी लोकसहभागातून कामे करणे शक्य असल्याने त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. तसेच चौथ्या टप्प्यासाठी (२०१८-२०१९) केल्या जाणाºया शिवार फेºया पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचेही सूचित करण्यात आले आहे.
धुळे जिल्हयात जलयुक्तची १६२ कामे प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 5:09 PM
लघू सिंचन विभाग : २६७ कामे झाली पूर्ण; जिल्हा परिषदेत आज अधिका-यांची बैठक
ठळक मुद्देजि.प.च्या लघू सिंचन विभागातर्फे २०१७-२०१८ या वर्षात मंजूर ४२९ कामांपैकी ४१९ कामांचे जिओ टॅगिंगचे काम पूर्ण झाले आहे. तसेच ४२९ कामांवर १६ कोटी ८४ लाख ९ हजाराचा खर्च होणार असल्याचे सांगितले जात आहे.