आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यासाठी बी.टी. कापूस बियाण्यांची १ लाख ७५ हजार पाकिटे उपलब्ध झाली असून, त्याची विक्री सुरू झालेली आहे. तसेच जिल्ह्यात खतांचीही चणचण भासणार नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भालचंद्र बैसाणे यांनी दिली.जिल्ह्याचे खरीपाचे क्षेत्र ४ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून, त्यापैकी २ लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होईल, असे कृषी विभागाचे नियोजन आहे.जिल्ह्यासाठी ८ लाख ४० हजार बी.टी. कापसाची पाकीटांची मागणी करण्यात आलेली आहे. त्यापैकी २१ मे पर्यंत १ लाख ७५ हजार बी.टी.कापूस बियाण्यांची पाकिटे उपलब्ध झालेली असून त्यांची विक्रीही सुरू झालेली आहे. मागणी केलेली बी.टी.ची पाकिटे १० जून १८ पर्यंत मिळतील असे अपेक्षित आहे. त्यामुळे बी.टी.बियाण्यांची शेतकºयांना चणचण भासणार . तसेच खतांचाही पुरेसा साठा उपलब्ध होईल असेही त्यांनी सांगितले.पाच पथकांची नियुक्तीबनावट बियाणे, खते, व कीटकनाशकांची विक्री करणाºया विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे.त्यासाठी पाच पथकांची नियुक्ती केली आहे. यात प्रत्येक तालुक्यात एक-एक व जिल्हास्तरावर एक अशा पाच पथकांचा सवावेश आहे. जिल्हास्तरीय पथकामध्ये कृषी विकास अधिकारी बैसाणे, रमेश नेतनराव आदींचा समावेश आहे.गेल्या वर्षभरात बनावट बियाणांच्या १०४ तक्रारी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार या विभागामार्फत केलेल्या कारवाईत १०० बनावट बियाणांचे पाकिटे जप्त केली होती. नॉन बिटी कॉटनच्या नावाखाली बिटी कॉटन सांगून बियाणांची विक्री केली जात होती. त्यानुसार कृषी विभागामार्फत केलेल्या कारवाईत ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तर ५ विक्रेत्यांचे विक्री परवाने निलंबित तर १७ विक्रेत्यांचे विक्री परवाने हे कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. या विभागाने जिल्ह्यातील १ हजार १० बियाणे विक्रीच्या दुकानांची तपासणी केली होती.