लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : शहरातील एन.डी.मराठे विद्यालयात शुक्रवारी दुपारी तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योगपती सरकारसाहेब रावल यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनात विद्यार्थी व शिक्षकांकडून १७७ उपकरणे सादर करण्यात आली आहे. दोन दिवशीय प्रदर्शनाचा आज समारोप होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शारदा देवी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष साहेबराव मराठे हे होते. कार्यक्रमास जि.प. शिक्षण सभापती नूतन पाटील, शिंदखेडा पं.स. उपसभापती सुनिता निकम, सहायक कक्ष अधिकारी सयाजी पारखे, जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम, भाजपचे नरेंद्रकुमार गिरासे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ पाटील, प.स. सदस्य सतीश पाटील, शानाभाऊ सोनवणे, मनोहर देवरे, जिजाबराव सोनवणे, गटविकास अधिकारी सुरेश शिवदे, संजीवनी सिसोदे, गटशिक्षणाधिकारी मनीष पवार, संस्थेचे अध्यक्ष साहेबराव मराठे, सदस्य मधुकर सैंदाणे उपस्थित होते.विज्ञान प्रदर्शनामुळेच विज्ञानाला एक नवी दिशा मिळते. त्यामुळे विज्ञान शिक्षण ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग संशोधनासाठी करावा असे आवाहन सरकारसाहेब रावल यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सतीश बागल व तृप्ती अहिरराव यांनी केले. या विज्ञान प्रदर्शनात मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर डी सिसोदे व पदाधिकारी, विज्ञान व गणित अध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष जे डी भदाणे व पदाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक बाल वैज्ञानिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक सतीश बागुल , तृप्ती देवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अमोल मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक परिश्रम घेत आहेत.
विद्यार्थी व शिक्षकांकडून १७७ उपकरणे सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 10:57 PM