ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.4 - धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे, शिंदखेडा, मालेगाव व सटाणा तालुक्यात काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत सुमारे 19 कोटींचा निधी डॉ. सुभाष भामरे यांनी मंजूर करून आणला. या निधीचा लाभ 32 गावांना होणार आह़े
या योजनेचा लाभ धुळे तालुक्यातील भिरडाई, भिरडाणे, बोरीस, चौगाव, मोघन, नांद्रे, निमडाळे, वडगाव व दुसाने सर्कलमधील विरखेल, हट्टी, पारगाव, शिंदखेडा तालुक्यातील आर्वे, चिमठाणे, दभाशी, हातनूर, मुडावद, पढावड, पाथरे, रुदाणे, शेवाडे, आक्कलकोस, चौदाणे, वणी, वरसूस, वघाडी खुर्द, विटाई, मालेगाव तालुक्यातील आघार खुर्द, दुधे, सायदे, बोरदर आणि सटाणा तालुक्यातील भीमखेत, चौगाव, इजमाणे, वटार या गावांना होणार आह़े