धुळे : शहरातील चितोड रोडवरील संभाप्पा कॉलनीतून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 60 हजार रुपये किमतीचे 200 लीटर स्पिरीट जप्त केले. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली़ पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संभाप्पा कॉलनीत पंकज विजय कदम यांच्या घराच्या आडोशाला स्पिरीट असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने गुरुवारी रात्री छापा टाकला असता गैरकायदा स्पिरीट आढळून आले. या ठिकाणी 200 लीटरचा निळ्या रंगाचा एक ड्रम संरक्षण भिंतीलगत ठेवण्यात आला होता. त्यात 60 हजार रुपये किमतीचा 200 लीटर स्पिरीटचा (प्रती 300 रुपये लीटर) साठा केलेला होता. तो जप्त करण्यात आला. ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक देवीदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पो़ह़ेकॉ. सुनील विंचूरकर, संदीप थोरात, महेंद्र कापुरे, मायूस सोनवणे, चेतन कंखरे, अमित रणमाळे, विजय सोनवणे, दीपक पाटील यांनी केली. दरम्यान, हे स्पिरीट बंटी आण्णा गायकवाड (रा.रेल्वे स्टेशन रोड) व सोनू पाटील (रा.साने गुरुजीनगर) यांचे असल्याची माहिती पंकज कदम याने पोलिसांना दिली. सदर स्पिरीट साठा नष्ट करण्यात आला आहे. याप्रकरणी पो़कॉ. नितीन मोहन यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
संभाप्पा कॉलनीतून 200 लीटर स्पिरीट जप्त
By admin | Published: April 28, 2017 11:46 PM