ऑनलाईन लोकमत
धुळे, दि. 19 - जैताणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रूग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने शेकडो रूग्ण ताटकळले होत़े अखेर परिसरातील युवकांचा संताप अनावर झाल्याने त्यांची ग्रामीण रूग्णालय कर्मचा:यांशी हमरीतुमरी झाल्याची घटना घडली़ जैताणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालयाच्या कारभाराचा भोंगळपणा यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला. सोमवार हा जैताणेच्या आठवडे बाजाराचा दिवस आहे. यानिमित्ताने जैताणे निजामपूरसह माळमाथ्यावरील रूग्ण येथील सरकारी आरोग्य केंद्रात येत असतात़ सोमवारी सकाळी 8 वाजेपासून 200 ते 250 महिला ज्येष्ठ नागरिक रुग्णालयातील कर्मचा:यांच्या प्रतीक्षेत बसून होत़े 11़30 वाजूनही ग्रामीण रूग्णालयातील एकही कर्मचारी उपस्थित नव्हता़ आजारपणाच्या व्यथा घेऊन आलेल्या नागरिकांचा यामुळे संताप होत असतानाच परिसरातील काही तरूण याठिकाणी आले. त्यांनी पाहिलेला प्रकार नित्याचाच असल्याने त्यांचाही रोष वैद्यकीय कर्मचा:यांवर होता. त्यापैकी काहींनी या कर्मचा:यांकडे वरिष्ठांच्या संपर्क क्रमांकाची मागणी केली़ कर्मचा:यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने या तरूणांनी लेटलतिफ ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिका:यांना गेटवरच अडवत जाब विचारला त्यावेळी आरोग्य अधिका:याने आपली नेमणूक जैताणे येथे नाहीच, आठवड्यातून एक दिवस रोटेशन वर त्याना तिथे पाठवण्यात आले असून दुपारून पुन्हा साक्री ग्रामीण रूग्णालयात हजेरी लावायची असल्याने ते भोंगळ कारभराला जबाबदार नाहीत असे त्यांनी सांगितल़े