लोकमत न्यूज नेटवर्कधुळे/शिरपूर : लॉकडाउनमुळे धुळे आणि शिरपूरमध्ये अडकलेल्या २२६ स्थलांतरीत कामगारांना प्रशासनाने शनिवारी बिहारला रवाना केले़लॉकडाउनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना पासेस देण्यासाठी जिल्हा पूनर्वसन अधिकारी प्रज्ञा बडे-मिसाळ यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे़ त्यांनी बिहारच्या १३५ कामगारांना परवानगी दिल्यानंतर धुळे शहराचे तहसिलदार संजय शिंदे यांनी सहा बसेसद्वारे त्यांना भुसावळ येथे रवाना केले़ तेथून श्रमीक रेल्वेने या मजुरांना बिहारकडे सुखरुप पाठविण्यात आले़ गरजू कामगारांना दोन वेळचे भोजन, बिस्कीटे आणि पिण्याचे पाणी दिले असल्याची माहिती तहसिलदार शिंदे यांनी दिली़शिरपूर येथून भुसावळकडे जाण्यासाठी बसेसची व्यवस्थ करण्यात आली आहे़ त्यासाठी सुरुवातीला किती परप्रांतीय आहेत याच्या माहितीचे संकलन करण्यात आले़ त्यानंतर विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार बसेचे नियोजन केल्याने त्यासाठी ४ बसेस परप्रांतीयांसाठी सज्ज करण्यात आल्या़ शनिवारी सकाळी शिरपूर येथील बसस्थानक आवारात परप्रांतीय जमा होण्यास सुरुवात झाली होती़ या सर्वांसाठी ४ बसेस तयार करण्यात आल्या असल्याने तत्पुर्वी त्यांच्या नावांसह माहितीच्या संकलनानुसार त्यांची खात्री करण्यात आली आणि त्यांना बसेसमध्ये बसविण्यात आले़कटीयारकडे गेलेले ९१ विद्यार्थी भुसावळच्या दिशेने शनिवारी सकाळी मार्गस्थ झाले़ तत्पुर्वी शिरपूरचे आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन , मुख्याधिकारी अमोल बागुल , शिरपूर आगाराचे व्यवस्थापक वर्षा पावरा, नगरसेवक इरफान मिर्झा, मौलाना यांच्यासह अन्य उपस्थित होते़ या सर्व मान्यवरांच्या हस्ते आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून तसेच तोंडाला मास्क लावून हिरवा झेंडा दाखविण्यात आला़ सर्व काही सुरळीत आहे का याची खातरजमा केल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या ४ बसेस भुसावळकडे रवाना करण्यात आल्या़ सकाळीच या बसेस रवाना झाल्या़
२२६ मजुर बिहारला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 8:34 PM