शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
3
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
4
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
5
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
6
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
7
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
8
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
10
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
11
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
12
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
14
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
15
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
16
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
17
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
18
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
19
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
20
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे

30 हजारांची दारू व मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2017 12:12 AM

शहादा पोलिसांची कारवाई : मानमोडे गावाजवळ ‘गावठी’चे अड्डे उद्ध्वस्त

मंदाणे : शहादा तालुक्यातील मानमोडे येथील नदीकाठावर मंगळवारी सकाळच्या सुमारास पोलिसांनी अचानक छापा टाकून गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत सुमारे 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याने अवैधरीत्या दारू तयार करणा:यांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांची गाडी दिसताच दारू तयार करणा:यांनी पळ काढला.    याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रानुसार, शहादा तालुक्यातील मानमोडे गावाचा स्वच्छता अभियानात व निर्मलग्राम योजनेत उत्कृष्ट पुरस्कार मिळालेले आदर्श गाव म्हणून जिल्ह्यात नावलौकिक आहे. मात्र अलीकडच्या काळात या ठिकाणी जवळच असलेल्या नदीवर ठिकठिकाणी हातभट्टीची रसायनयुक्त दारूची निर्मिती करून ती विक्री करण्याचे जणू केंद्रच बनले आहे. अशा स्थितीत शहादा पोलिसांना मानमोडे गावाजवळ गावठी हातभट्टीच्या दारूची मोठय़ा प्रमाणात निर्मिती होऊन शेकडो लीटर दारू विक्री           केली जात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच डीवाय.एस.पी. लतीफ तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर यांनी हवालदार दासू वसावे, धनराज जाधव, प्रकाश तमखाने, राहुल बोराडे, छोटूलाल पावरा, बलविंदर ईशी, अरुण चव्हाण, करण वळवी, अफसर शहा, देवीदास गागडे, सुनील वाकडे आदी सहका:यांसह मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास मानमोडे गावाजवळील म्हैस नदीवरील अवैधरीत्या गावठी हातभट्टीचे दारू तयार करण्याच्या ठिकाणी अचानक छापा टाकला. त्या वेळी दारू            तयार करणा:यांनी पोलिसांची गाडी दुरूनच पाहून पळ काढला. या कारवाईत पोलिसांनी दारू तयार करण्याचे अड्डे तत्काळ उद्ध्वस्त केले. प्लॅस्टिकचे ड्रम, पत्र्याच्या टाक्या व मातीच्या माठांमधील महू, रसायनाचे मिश्रण नष्ट केले व रबरी टय़ूबमध्ये असलेली सुमारे 200 ते 250 लीटर तयार  दारू, रिकामे केलेले 10 ड्रम, घागरी, माठ, पाच पत्र्याच्या टाक्या असा एकूण 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी शहादा पोलीस स्टेशनला करणसिंग वळवी, बलविंदर ईशी व अरुण चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सुनील चंद्रसिंग पावरा, राजेश वेल्ला पावरा, सरवी देवीसिंग पावरा, सर्व रा.मानमोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     (वार्ताहर)धाडसत्र सुरूच राहणारमानमोडे येथील दारूचे अड्डे उद्ध्वस्त केल्याने मोठा दारूसाठा जप्त करण्याच्या पोलिसी कारवाईमुळे परिसरात ठिकठिकाणी अवैधरीत्या गावठी हातभट्टीची तसेच बनावट दारूची विक्री करणा:यांमध्ये खळबळ उडाली आहे. दारू तयार करून विक्री करणा:यांनी असे अवैध धंदे ताबडतोब बंद करावेत, अन्यथा अशा प्रकारचे धाडसत्र सुरूच ठेवले जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी दिला आहे.मानमोडे येथील दारू अड्डय़ावर धाडसत्र सुरू होताच दारू तयार करणा:यांनी लांबूनच गाडी बघून पळ काढला. मात्र त्यांची नावे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना पोलीस लवकरच ताब्यात घेणार असल्याचे समजते.