धुळे : मनपा प्रशासनाने स्थायी समिती सभापतींना सादर केलेले प्रशासकीय अंदाजपत्रक स्थायी समितीत मंजूर झाल्यानंतर वाढीव तरतुदी करून सोमवारी महापौर जयश्री अहिरराव यांना सादर करण्यात आल़े लवकरच अंदाजपत्रकाला महासभेत मंजुरी मिळणार आह़े मनपा प्रशासनाने शिल्लकीसह 294 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समिती सभापतींना 15 फेब्रुवारीला सादर केले होत़े सदर अंदाजपत्रक स्थायी समितीत सादर केल्यानंतर काही तरतुदी कमी करून काही तरतुदींची वाढ करण्यात आली़ वाढीनंतर अंदाजपत्रक 309 कोटींवर पोहचले असून महासभेत ते सादर केले जाणार आह़े महासभेत मांडल्या जाणा:या या अंदाजपत्रकात आणखी वाढीव तरतुदी सुचविल्या जातील़ ते 12 एप्रिलला महासभेत सादर होईल़ नगरसेवक विकास निधी (11 कोटी, 25 लाख), मनपा हद्दीत प्रवेश होणा:या महामार्गावर प्रवेशद्वार उभारणे (1 कोटी), नागरिकांचा विमा (25 लाख), सावित्रीबाई फुले सुकन्या योजना (36 लाख), स्वच्छ धुळे, सुंदर धुळे प्रभागनिहाय बक्षीस योजना (15 लाख), महापौर केसरी कुस्ती स्पर्धा (10 लाख), स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजना (10 लाख), राष्ट्रीय खेळाडू व कलावंत सत्कार (5 लाख), छत्रपती संभाजी महाराज, संत गाडगे महाराज व संत रविदास यांचा पुतळा बसविणे (75 लाख), रोजगार हमी कर (1 लाख 71 हजार 500), महाराष्ट्र शिक्षण कर (34 लाख 30 हजार), मनपा निधी विकासकामे (2 कोटी 35 लाख) अशी एकूण 16 कोटी 72 लाख 1 हजार 500 रुपयांची वाढीव तरतूद स्थायी समितीने केली आह़े त्यामुळे मनपा प्रशासनाचे 294 कोटी 36 लाख 66 हजार 811 रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीने सुचविलेल्या वाढीनंतर तसेच काही लेखाशीर्षासाठी प्रशासनाने केलेल्या तरतुदीत काही प्रमाणात कपात करून अंदाजपत्रक 309 कोटी 69 लाख 58 हजार 645 वर पोहचले आह़े सदरचे अंदाजपत्रक लवकरच महासभेत मंजुरीस्तव मांडले जाणार आह़े
309 कोटींचे अंदाजपत्रक महापौरांना सादर!
By admin | Published: March 29, 2016 12:53 AM