आॅनलाइन लोकमतधुळे : सर्वसामान्यांसह गोरगरीब मुलांवर संस्कार करणाºया व राज्याच्या भविष्याचा पाया भक्कम करणाºया अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांना प्रत्येकी दोन गणवेश देण्यात येणार असून, त्यासाठी ३० लाख ९६ हजाराचा निधी मंजूर झाला. हा निधी संबंधित अधिकाºयाच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. यात केंद्राचा हिस्सा ६० टक्के असून, राज्याचा हिस्सा ४० टक्के असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील एकात्मिक बालविकास विभागातून देण्यात आली. समग्र शिक्षा अभियानतर्फे शालेय विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यात येतात. त्याच धर्तीवर एकात्मिक बालविकास विभागातर्फे अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनाही दरवर्षी दोन गणवेश दिले जातात. २०१८-१९ या वर्षाकरिता अंगणवाडी सेविकांना प्रती गणवेश ४०० रूपयांप्रमाणे दोन गणवेशांसाठी ८०० रुपए देण्यात आले आहेत. यात अंगणवाडी सेविका साड्या, अथवा ड्रेस घेऊ शकतात. मात्र घेतलेल्या गणवेशाचे त्यांना बिल सादर करावे लागणार आहे. धुळे जिल्ह्यात एकूण २ हजार १०४ अंगणवाड्या आहेत. त्यात १ हजार ८४१ अंगणवाडी सेविका, १ हजार ७८४ मदतनीस, व १७७ मिनी अंगणवाडी सेविका अशा एकूण ३ हजार ८०२ सेविका कार्यरत आहेत. सेविका, मदतनीस यांच्या गणवेशांसाठी ३० लाख ९६ हजाराचा निधी मंजूर झालेला असून, तो संबंधित अधिकाºयांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे. यात केंद्राच्या ६० टक्के हिश्याप्रमाणे १८ लाख ५७ हजार ६०० रुपए तर राज्याच्या ४० टक्के हिश्यानुसार १२ लाख ३८ हजार ४०० रूपयांचा निधी मिळालेला असल्याचे सांगण्यात आले.
धुळे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या गणवेशासाठी ३१ लाखांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 3:06 PM
जिल्ह्यातील ३८०२ सेविका, मदतनीसांना मिळणार प्रत्येकी दोन गणवेश
ठळक मुद्देजिल्ह्यात ३८०३ सेविका मदतनीस कार्यरतप्रत्येक सेविका,मदतनीसला मिळणार दोन गणवेशगणवेशासाठीचा निधी संबंधित अधिकाºयाच्या खात्यावर वर्ग