आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषदेत अनुकंपधारकांच्या आज मुलाखती घेण्यात आल्या. यातून ३३ जणांची निवड करण्यात आली असून, त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेत अनुकंपधारकांना सेवेत घ्यावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अनुकंपधारकांची यादीही मोठी आहे. २०१६ मध्ये अनुकंपतत्वावर २३ जणांची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यानंतर अनुकंपधारकांची भरती झालेली नव्हती. अनुकंपधारकांची संख्या जवळपास ५६ आहे.यापैकी बुधवारी ३५ जणांना मुलाखतीसाठी जिल्हा परिषदेत बोलविण्यात आले होते. त्यापैकी ३३ जणांची मुलाखत मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाळे यांनी घेतल्या.मुलाखतीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना जिल्हा परिषदेतील रिक्त जागांवर पदस्थापना देण्यात आली. यात आरोग्य सेवक पुरूष १४, आरोग्य सेविका एक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक २, कनिष्ठ अभियंता २, परिचर ७, कनिष्ठ अभियंता १, प्राथमिक शिक्षक, ३ व ग्रामसेवक पदावर एकाची नियुक्ती करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागातून सांगण्यात आले. अनुकंपधारकांची आज मुलाखत असल्याने, जिल्हा परिषदेला यात्रेचे स्वरूप आले होते. काहीजण परिवारासह आले होेते.दरम्यान अजून २१ अनुकंपधारक प्रतीक्षा यादीवर आहे. त्यांना कधी संधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
धुळे जिल्हा परिषदेत ३३ अनुकंपधारकांना मिळाली नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 5:27 PM
मुलाखत घेतल्यानंतर पात्र उमेदवारांना सेवेत समावून घेतले, नियुक्तीपत्र देणार
ठळक मुद्देअनुकंपधारकांना सेवेत घेण्याची अनेक वर्षांची मागणी२०१६ मध्ये २३जणांची झाली होती नियुक्तीतीन वर्षांनंतर पुन्हा अनुकंपा भरती झाली.