धुळे :खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटप सुरू झालेले असून, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतर्फे आतापर्यंत ४९३३.२९ लाख कर्जाचे वाटप झाले असून, त्याची टक्केवारी ३६ टक्के असल्याची माहिती सहायक निबंधक मनोज चौधरी यांनी दिली.२०२०-२१ या वर्षांसाठी पीक कर्ज वाटपास एक एप्रिलपासून सुरूवात झालेली आहे. खरीप हंगामासाठी १३ हजार ७४९ लाख पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. ८ मे पर्यंत ४ हजार ९३३.२९लाख कर्जाचे ७ हजार २५१ शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप झालेले आहे. त्याची टक्केवारी ३६ टक्के आहे.बियाण्यांची मुबलकताजिल्ह्यात ४ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची लागवड प्रस्तावित आहे. त्यासाठी ४० हजार ७९५ क्विंटल विविध बियाणे उपलब्ध होणार आहे. यात महाबिजकडून २२९६ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा होणार आहे.तर खरीप हंगामासाठी १ लाख २ हजार ७२० मेट्रीक टन खतांचे आवंटन मंजूर झालेले आहे. लवकर खते उपलब्ध होतील अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून देण्यात आली आहे.
खरीपसाठी आतापर्यंत ३६ टक्के कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 9:17 PM