शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

४२ प्राथ.शिक्षक झाले मुख्याध्यापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 9:41 PM

जिल्हा परिषद : दोन वर्षांनी मिळाली शिक्षकांना पदोन्नती, अधिकाºयांनी केले शिक्षकांचे समुपदेशन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्हा परिषदेमधील खुल्या प्रवर्गातील ४२ शिक्षकांना आज मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली आहे.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पदोन्नतीबाबत समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर शिक्षण सभापती नूतन पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन, उपशिक्षणाधिकारी पी.टी. शिंदे उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळांमधील खुल्या प्रवर्गातील मुख्याध्यापकांची पदोन्नती गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली होती. पदोन्नतीने मुख्याध्यापकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार मंगळवारी ही पदोन्नतीची प्रक्रिया पार पडली. यावेळी शिक्षकांचे समुपदेशन करून, मोठ्या पडद्यावर शिक्षकांना रिक्त असलेली शाळा दाखविण्यात आल्या. प्राधान्यक्रमानुसार पदोन्नती देण्यात आली.   जिल्हा परिषद शाळेतील ४२ प्राथमिक शिक्षकांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती करण्यात आलेली आहे. यापूर्वी २०१६ मध्ये प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली होती. मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळालेल्यांमध्ये   शिरपूर  १०, साक्री  १७, शिरपूर  ८ व धुळे तालुक्यातील ७ शिक्षकांचा समावेश आहे. दरम्यान ४२ शिक्षकांना पदोन्नती मिळाल्याने ती पदे रिक्त झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात १७ विषय शिक्षकांना व १७ पदवीधर शिक्षकांना पुन्हा प्राथमिक शिक्षकाच्या पदावर काम करावे लागणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.  दरम्यान पदोन्नती मिळालेल्या सर्वच शिक्षकांना नवीन मिळालेल्या शाळांवर हजर होण्याचे आदेश शिक्षण विभागातर्फे देण्यात आलेले आहेत. पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहायक प्रशासन अधिकारी एल.पी. भदाणे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रंजना साळुंखे, रवींद्र देवरे, वरिष्ठ सहायक प्रविण शिंदे, मंगेश राजपूत, तुषार बैसाणे यांनी परिश्रम घेतले. यावेळी शिक्षक उपस्थित होते.  जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील ७७ शिक्षकांचे समायोजन धुळे - जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक शाळांमधील ७७ शिक्षकांचे समायोजन नुकतेच करण्यात आले आहे.मुख्याध्यापक व संस्थांनी संच मान्यतेसाठी कागदपत्रे सादर केल्यानंतर दस्तऐवजाची पडताळणी झाली. त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांची यादी निश्चित करण्यात आली. संचमान्यतेनुसार जिल्ह्यात १२ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. गेल्यावर्षी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने ९९ शिक्षकांना अतिरिक्त ठरविले होते. त्यापैकी ८४ शिक्षकांचे आॅनलाइन समायोजन करण्यात आले होते. मात्र यातील काही शिक्षकांना समायोजित करण्यात आले नव्हते. त्यामुळे जिल्ह्यात ७७ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. या शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी नुकतेच  चावरा इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये समूपदेशन शिबिर झाले. त्यात शिक्षकांना शाळांची यादी दाखवून त्यांचे समायोजन केले. यावेळी माध्यमिक शिक्षण विभागातील अनेक कर्मचारी, संस्थाचालक, मुख्याध्यापक उपस्थित होते. समायोजनानंतरही संस्था चालकांनी या शिक्षकांना हजर करून न घेतल्यास ही पद व्यपगत होऊ शकतात. दरम्यान समायोजित झालेल्या शिक्षकांना बुधवारी रूजू होण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे अहिरे यांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे