शिंदखेडा : येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात तालुका विधी सेवा समितीमार्फत शनिवारी महा लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विविध संस्थांची ३८ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली. तर ४६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.न्यायाधीश दस्तगिर पठाण यांच्या अध्यक्षतेखाली महालोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पॅनल प्रमुख म्हणून अॅड.बी.झेड. मराठे, अॅड.पी.एस. परदेशी तर प्रमुख पाहुणे म्हणून वकील संघाचे अध्यक्ष एन.बी. मराठे, सचिव हर्षल अहिरराव, अॅड.अशोक गुजराथी, अधीक्षक आय.एस. बारी, एस.जी. अहिरे, अॅड.व्ही.पी. भामरे, सरकारी अभियोक्ता विठ्ठल पाडवी, अॅड.बुधा सोनवणे, अॅड.जे.डी. बोरसे, अॅड.वसंत पाटील, अॅड.आर.डी. महिरे, अॅड.जे.सी. मंगासे, अॅड.मिलिंद सोनवणे, अॅड.विनोद पाटील, अॅड.चेतन कोळपकर, अॅड.ए.एन. शेख, पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी भीमराव गरुड, सुदाम मोरे उपस्थित होते.८६ पैकी ४६ प्रकरणांचा निपटारामहा लोकअदालतमध्ये नगरपंचायत शिंदखेडा, पंचायत समिती, तालुक्यातील ग्रामपंचायती, वीज वितरण कंपनी शाखा शिंदखेडा व बेटावद स्टेट बँक शाखा तसेच कलम १३८ च्या २२ पैकी ५ केसेस निकाली, खावटीच्या १३ पैकी ७ निकाली, तसेच दिवाणी दावे १८ पैकी ६ निकाली काढण्यात आले. असे एकूण ८६ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील ४६ प्रकरणांचा निपटारा करून खातेदारांकडून ३८ लाख रुपये थकबाकी वसूल करण्यात आली. यासाठी न्यायालयीन कर्मचारी विवेक पंचभाई यांनी परिश्रम घेतले.
महालोकअदालतमध्ये ४६ प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:25 PM