धुळे : ए.टी.एम. खरेदीत पाच कोटी ४९ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी धुळे - नंदुरबार गर्व्हमेंट सर्व्हंट बॅँकेच्या चेअरमनसह संचालक मंडळ व अधिकारी अशा ४६ जणांविरूद्ध बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.विशेष लेखा परीक्षक वसंत राठोड यांनी या गैरव्यवहारप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली. कर्जावरील व्याज वसूल झाले नसताना त्याचे ४ कोटी ४४ लाख ५३ हजार २०५ रुपयांचे उत्पन्न दर्शविण्यात आल्याचे तसेच ए.टी.एम. खरेदीसाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी घेण्यात आली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सरकारी कर्मचारी बँकेच्या चेअरमनसह ४६ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 5:01 AM