लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : धुळे तालुक्यातील धनुर लोणकुटे ग्रुप ग्रामपंचायतमार्फत गावात ‘एक घर एक वृक्ष’ मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत गावात ३ हजार २०० वृक्षांची लागवड करण्यात आली.गटनेते सुनील रोहिदास शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘एक घर एक वृक्ष’ ही मोहीम राबविण्यात आली. यासाठी सरपंच सत्यभामाबाई रोहिदास शिंदे यांनी पुढाकार घेतला. जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना व गावात मोफत रोपे वाटप करण्यात आली. यासाठी शिक्षक सतीश शिंदे यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. याप्रसंगी ग्रा.पं. सदस्य युवराज चौधरी, धर्मराज शिंदे, कमलबाई पटेल, मालुबाई शिंदे, माधुरी शिंदे, लताबाई चौधरी, प्रज्ञा भामरे, साहेबराव कोळी, छत्रपती सरकार ग्रुपचे कार्यकर्ते शरद बोरसे, अशोक शिंदे, अरुण शिंदे, रोहीदास शिंदे, शरद बोरसे, योगेश शिंदे, बाळासाहेब शिंदे, जगदीश बोरसे, शरद शिंदे, सुनील पाटील, भटू पाटील, पवन बोरसे, कांतीलाल पटेल, चिंधा सैंदाणे, अशोक शिंदे, जितेंद्र भामरे, धनराज शिंदे, गोविंदा शिंदे, शशिकांत शिंदे, धर्मराज बोरसे, रवींद्र भामरे, महेंद्र शिंदे, संदीप शिंदे, किशोर बोरसे, बबलू शिंदे, शांतू गोसावी, राव कोळी, सुरेश वाघ, विशाल जाधव, संतोष शिंदे, आनंदा शिंदे, अनंत खैरनार, बळीराम गोसावी, मधुकर शिंदे, निलेश शिंदे, भटू खैरनार, एकलव्य ग्रुपचे अध्यक्ष गेंदीलाल पवार यांनी परिश्रम घेतले.
धनुर लोणकुटे येथे ३२०० वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 11:54 AM