आॅनलाईन लोकमतधुळे : मानव विकास कार्यक्रमांतर्गत २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात १६२ अभ्यासिका सुरू आहेत. त्याचा जिल्हयातील ५२९८ विद्यार्थी लाभ घेत आहेत. या अभ्यासिकांसाठी १४ लाख ५८ हजार रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयातून मिळाली आहे. मानव विकास कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे व मानव विकासावर आधारित योजना राबविणे या पार्श्वभूमिवर २०११-१२ व २०१२-१३ मध्ये मंजुरी दिलेल्या अभ्यासिकांपैकी ज्या अभ्यासिका २०१७-१८ मध्ये सुरू आहेत, त्या अभ्यासिकांसाठी व्यवस्थापक व सेवक तसेच इतर खर्चाच्या आर्थिक तरतुदीसाठीचा संबंधित अधिकाºयांचा अहवाल मिळाला आहे. शहरी भाग वगळून जिल्हयातील धुळेसह साक्री, शिरपूर, शिंदखेडा या तालुक्यातील काही प्रमुख गावांमध्ये या अभ्यासिका सुरू आहेत. अभ्यासिकेचे कामकाज सुरळीत पार पाडावे यासाठी अभ्यासिकेत व्यवस्थापक व सेवक यांची नियुक्ती करण्यात येते. या दोघांनाही ठराविक मानधन देण्यात येत असते. एका अभ्यासिकेतील व्यवस्थापक व सेवक मिळून ७ हजार व इतर खर्च २ हजार असा एकूण ९ हजार रूपये साधारणत: दरवर्षाला खर्च येत असतो. यासाठी १४ लाख ५८ हजार रूपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. यात ११ लाख ३४ हजार व्यवस्थापक व सेवकांच्या मानधनावर तर ३ लाख २४ हजार रूपये इतर खर्च अपेक्षित आहे.५२९८ विद्यार्थी घेतात लाभया अभ्यासिकांचा कालावधी जुलै ते मार्च असा ९ महिन्यांचा असतो. या अभ्यासिकांचा लाभ जिल्ह्यातील ५हजार २९८ विद्यार्थी घेत आहेत. यात धुळे तालुक्यातील १२०६, साक्री तालुक्यातील १८१८, शिंदखेडा तालुक्यातील १६४२ व शिरपूर तालुक्यातील ६३२ विद्यार्थी लाभ घेत असल्याचे सांगण्यात आले. या अभ्यासिकांचा दहावीच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक लाभ होत असतो.
धुळे जिल्हयातील ५३०० विद्यार्थी घेतात अभ्यासिकांचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:19 PM
मानव विकास कार्यक्रमांतर्गत अभ्यासिकांसाठी १४ लाख ५८ हजार रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मंजुरी
ठळक मुद्देधुळे जिल्ह्यात १६२ अभ्यासिका सुरूअभ्यासिकांसाठी व्यवस्थापक व सेवकांची नियुक्तीविद्यार्थी मोठ्या प्रमाणात घेतायेत लाभ