लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील आग्रारोडवरील कराचीवाला खुंट परिसरातील सुमारे सव्वाशे वर्ष जुनी जीर्ण इमारत मंगळवारी सकाळी ८़२० वाजता अचानक कोसळली़ या इमारतीत कुणीही राहत नसल्याने जिवीतहानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले आहे़ या घटनेनंतर आग्रारोडवरील वाहतूक बंद करण्यात आली़शहरातील आग्रारोडवरील कराचीवाला खुंट चौकाच्या कोपºयावर डॉ़ मनोज जोशी यांच्या मालकीची तीन मजली जीर्ण इमारत मंगळवारी सकाळी अचानक कोसळली़ सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ही विटामातीचे बांधकाम असलेली इमारत कोसळली़ या इमारतीत असलेल्या तीन दुकानांमधील साहित्याचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे़ भाडेकºयांनी याप्रकरणी आधीच न्यायालयात धाव घेतल्याने इमारतीचा वाद न्यायप्रविष्ट आहे़ दरम्यान, इमारत कोसळल्यानंतर मोठा आवाज झाल्याने आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली़ मनपाच्या अतिक्रमण विभाग व शहर वाहतूक पोलीसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत अग्निशमन बंब, पोलीस वाहने आडवी लावून आग्रारोडवरील वाहतूक बंद केली़ पावसाळयापूर्वी या जीर्ण इमारतीला मनपाने नोटीस दिली होती, शिवाय न्यायालयाच्या निकालानंतर ती पाडण्याचे प्रयोजनही होते, परंतु तत्पूर्वीच इमारत जमिनदोस्त झाली अशी माहिती इमारतीचे मालक डॉ़ मनोज जोशी यांनी दिली़ इमारत कोसळल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे़ या घटनेनंतर त्याठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती़
धुळयात सव्वाशे वर्ष जुनी जीर्ण इमारत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 9:34 AM
सुदैवाने जिवीतहानी नाही, आग्रारोडवरील घटना
ठळक मुद्दे-आग्रारोडवर जीर्ण इमारत कोसळली-सुदैवाने जिवीतहानी नाही, मात्र लाखोंचे नुकसान-रात्रभराच्या पावसामुळे इमारत कोसळल्याचा अंदाज