देवेंद्र पाठक । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरासह जिल्ह्यात वाढत असलेली गुन्हेगारी आणि शस्त्र बाळगणाºयांच्या प्रमाणात झालेली वाढ लक्षात घेता शस्त्र शोध मोहीम राबवून पोलिसांनी गुंडगिरीच्या मुसक्या आवळल्या़ गेल्या पाच वर्षात पोलिसांनी जिल्ह्याभरातून ५६ शस्त्र हस्तगत केली असून १२३ आरोपींना जेरबंद केले आहे़ शस्त्रधारकांविरुध्द कारवाईनाशिक परिक्षेत्राचे तत्कालिन विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्या आदेशानंतर जिल्ह्यात अवैध शस्त्र धारकांविरुध्द कारवाई करण्यात आली़ ३ मे २०१८ पासून राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत गावठी कट्टे, पिस्तूलसह जिवंत काडतूस, तलवारी असा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आल्या होत्या़मोहिमेची पार्श्वभूमीनाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर शहरात तसेच अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड या ठिकाणी विनापरवाना अवैध शस्त्राचा वापर करुन युवकांच्या हत्या केल्याच्या २ घटना घडलेल्या होत्या़ शस्त्रांचा वापर करुन सलग घडलेल्या दोन हत्येच्या घटनांची विनयकुमार चौबे यांनी गंभीरतेने दखल घेतली होती़ या परिक्षेत्रात अहमदनगर, जळगाव, नाशिक ग्रामीण, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये विनापरवाना व बेकायदा पिस्तूल, गावठी कट्टे, घातक शस्त्रे, बाळगणाºया गुन्हेगारांविरुध्द कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांना सुचना देण्यात आल्या होत्या़ त्यानुसार ३ ते २२ मे २०१८ पावेतो शस्त्र शोधण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली़ अधिकाºयांचा समावेशया मोहिमेत जिल्ह्यांमधील अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि सर्व पोलीस स्टेशन स्तरावर विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली़ त्यांच्याद्वारे अवैध शस्त्रांविरुध्दच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली होती़ कोम्बिंग आॅपरेशनचा फायदायानंतर जिल्ह्यातील पोलिसांनी वेगवेगळ्या टप्प्यात कोम्बिंग आॅपरेशन राबविले़ त्यातून शस्त्र हस्तगत करण्यात आली़ संशयितांना जेरबंदही केले़ अचानक राबविलेली ही मोहीम कौतुकास पात्र आहे़ पण, आमदार अनिल गोटे यांनी जुगार अड्यावर धाड टाकल्यामुळे पोलीस प्रशासन टिकेचे धनी ठरले होते़ त्यात पुन्हा विनयकुमार चौबे यांनी शोध मोहीम राबवून शस्त्र हस्तगत करण्याच्या सूचना पारीत केल्या़ या दोनही बाबी एकास वेळेस आल्याने धुळे पोलीस तसे ‘अॅक्टिव्ह’ झाले होते़ एका पाठोपाठ गावठी कट्टा, रिव्हॉलव्हर, हस्तगत करण्यात आले़ बिनधास्तपणे धारदार शस्त्र यांच्याकडे येतातच कुठून? आले तर ते जातात कुठे? याचा व्यवहार होतो कसा? याचा सर्वंकष शोध घेण्याची आवश्यकता आहे़ या कारवाईमुळे गुंडांचे चांगलेच धाबे दणाणले होते़गुन्ह्यांचे स्वरुप २०१५ २०१६ २०१७ २०१८ २०१९एकूण शस्त्र जप्त ०६ ०९ १७ २४ ०२एकूण अटक आरोपी ०७ २७ ३९ ४७ ०३दाखल गुन्ह्यांची संख्या ०५ ०७ १० २६ ०२
५६ ‘शस्त्र’ अन् १२३ ‘आरोपी’ जेरबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 10:23 PM