शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

धुळे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात ६ शेतकºयांची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 10:59 PM

नापिकी, कर्जबाजारीपणा : कर्जमाफीचाही लाभ नाही 

ठळक मुद्देसरकार अशा कुटुंबांना एक लाख रुपयाची मदत देते. त्यापैकी ३० हजार रुपये रोख स्वरुपात देण्यात येतात. तर उर्वरीत ७० हजार रुपये घरातील कर्त्या व्यक्तींच्या विशेषत: पत्नीच्या नावे बॅँकेत ठेव स्वरुपात ठेवले जातात. त्यापासून मिळणारे व्याज त्या कुटुंबाला मिळते. तून घरातील कर्त्या पुरूषाच्या धक्क्याने सैरभैर झालेल्या कुटुंबास थोडा दिलासा मिळतो. परंतु सध्या महागाईमुळे ही मदत तुटपुंजी ठरत असल्याचेही प्रत्ययास येत आहे. सरकारने या बाबत विचार केला पाहिजे, अशी भावना या कुटुंबीयांकडून व्यक्त होते. 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : नापिकी, कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. चालू सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत सहा शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतरही या घटना थांबलेल्या नाहीत. कारण चालू वर्षात जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या काळात ३२ शेतकºयांनी आत्महत्या केल्या असून आकडेवारीवरून त्याची कल्पना येते. राज्यात साधारण २००१ पासून शेतकरी आत्महत्या प्रत्ययास येण्यास सुरूवात झाली. जिल्ह्यात मात्र २००३ पर्यंत याबाबत निरंक स्थिती होती. मात्र २००४ व २००५ मध्ये अनुक्रमे तीन व दोन शेतकºयांनी आत्महत्या केल्या. दोन वर्ष आत्महत्या केलेल्या शेतकºयांची संख्या एक आकडी होती. मात्र २००६ पासून शेतकरी आत्महत्येच्या घटनांनी दुहेरी आकडा गाठला. त्या वर्षी तब्बल ४२ शेतकºयांनी आत्महत्या केली. त्यासाठी नापिकी, कर्जबाजारीपणा, नष्ट झालेले उत्पादन, सरकारी मदत मिळण्यात दिरंगाई अशी एक ना अनेक कारणे होती. तेव्हापासून शेतकरी आत्महत्येचा दुहेरी आकडा आजतागायत कायम राहिला आहे. गेल्या दोन-तीन वर्षात शेतकरी आत्महत्येच्या घटनांत आणखी वाढ झाली आहे. २०१५ मध्ये हा आकडा प्रथमच ६५ वर पोहचला. २०१७ मध्ये तो आणखी वाढून ७४ वर गेला. तर गतवर्षी २०१८ मध्ये ७६ शेतकºयांनी आत्महत्या केली. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेत शेतकरी आत्महत्या निर्मूलन सहायता समिती गठीत करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मदतीच्या प्रस्तावावर ही समिती विचारपूर्वक निर्णय घेते. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत समोर आलेल्या चार प्रस्तावांपैकी दोन पात्र तर दोन अपात्र ठरविले. २००४ पासून २०१७ पर्यंत ५८७ शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यापैकी  मदतीचे ३३९ प्रस्ताव पात्र ठरले तर २४८ कुटुंबांचे प्रस्ताव अपात्र ठरविले गेले आहेत. 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी