धुळे : शहरातील गल्ली नंबर 4 आणि 5 मधील बोळीत नरेश सूर्यवंशी याच्याकडून 6 किलो ओली भांग पोलिसांनी जप्त केली़ याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास एक संशयित त्यांना आढळला़ तो गल्ली नंबर 4 आणि 5 च्या बोळीत फिरत होता़ त्याला पोलिसांनी हटकल़े त्याची चौकशी करून झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ 6 किलो ओली भांग आढळली़ याशिवाय स्टीलची तगारी, भांग ठेवण्यासाठी प्लॅस्टिकच्या लहान पिशव्या आणि रोख 565 रुपये असा एकूण 2 हजार 665 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आह़े पकडण्यात आलेला संशयित नरेश मोरेश्वर सूर्यवंशी (38) हा मोगलाई पोलीस चौकीसमोर राहतो. त्याच्याविरुध्द स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.कॉ़ मनोज वसंत बागुल यांच्या फिर्यादीनुसार मुंबई प्रोव्हिजन अॅक्ट कलम 65 ई नुसार आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आह़े तपास सहायक उपनिरीक्षक सी़जी़ बागुल करीत आहेत़
6 किलो ओली भांग पोलिसांनी पकडली
By admin | Published: February 22, 2017 12:15 AM