शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

धुळे जिल्ह्यात जलयुक्त शिवारमुळे ६० हजार टीएमसी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 11:47 AM

चारवर्षात १ लाख २० हजार ७४२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले

ठळक मुद्देधुळे जिल्ह्यात २०१५ पासून जलयुक्त शिवार योजना सुरूचार वर्षात सव्वा लाख हेक्टर जमीन सिंचनाखालीविहिरींच्या जलपातळीत वाढ

आॅनलाइन लोकमतधुळे : जलयुक्त शिवार या महत्वाकांशी योजनेमुळे केवळ सिंचन क्षमताच वाढलेली नाही, तर असंख्य गावांचा ताळेबंद तयार झालेला आहे. धुळे जिल्ह्यात गेल्या चार वर्षांमध्ये जलयुक्त शिवारासाठी ५०४ गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये झालेल्या कामांमधून १ लाख १६ हजार ७४२ हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर या चार वर्षात ६० हजार ३७२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. लाभ असंख्य शेतकऱ्यांना झाला. त्याचबरोबर शेतीलाही संजीवनी मिळालेली आहे.पावसाचे पाणी शिवारातच अडवून भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, विकेंद्रीत जलसाठे निर्माण करणे, अस्तित्वात असलेल्या आणि निकामी झालेल्या जलस्त्रोतांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, आणि पाणी अडविण्याच्या कामात लोकसहभाग वाढविणे हा उद्देश घेऊन २०१५ पासून जलयुक्त शिवार ही ोजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.कृषी विभाग, जिल्हा परिषद लघुसिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,वनविभाग, सामाजिक वनीकरण, पाटबंधारे विभाग, नरेगा, भूजलसर्वेक्षण आदी विभागांच्या माध्यमातून जलयुक्त शिवाराची कामे करण्यात आली आहेत.जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २०१५-१६ मध्ये धुळे, साक्री, शिरपूर, शिंदकेडा या तालुक्यातून १२९ गावांची निवड करण्यात आली होती. या निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये विविध यंत्रणेमार्फत एकूण ५ हजार ०४९ कामे पूर्ण करण्यात आली. त्यासाठी ११ हजार ४४३.३४ लाख रूपये खर्च करण्यात आला. या कामामधून २३ हजार ६८७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला. तसेच ४७ हजार ३७३ हेक्टर संरक्षित क्षेत्र निर्माण झाले.या योजनेच्या दुसºया वर्षी म्हणजे २०१६-१७ यात जिल्ह्यातील १२३ गावांची निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये विविध यंत्रणेमार्फत २ हजार १७६ कामे करण्यात आली. त्यावर ८ हजार ३१४.२६ लाख रूपये खर्च करण्यात आला. या कामांमधून १८ हजार ३५० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला. तर ३६ हजार ६९९ हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण झाले आहे.या योजनेच्या तिसºया टप्यात २०१७-१८ मध्ये जिल्हयातून ९५ गावांची निवड करण्यात आली. त्यातून १५०९ कामे पूर्ण करण्यात आली. या कामातून १६ हजार ९४० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला. तर ३३ हजार ८८० हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण झाले आहे.२०१८-१९ या वर्षात १५७ गावांची निवड करण्यात आली. मार्च २०१९ अखेरपर्यंत ७९२ कामे पूर्ण झालेले असून, ५२७ कामे प्रगतीपथावर आहेत. यासाठी १२५१.३४ लाख रूपये खर्च झाला. यातून १ हजार ३९५ टीएमसी पाणीसाठी उपलब्ध झाला. तर २ हजार ७९० हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे