शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

धुळे जिल्ह्यात १५ वर्षात  ६४६ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 8:03 AM

दुष्काळासह नापिकीचे संकट : चालू वर्षात आतापर्यंत ५९ आत्महत्या, २५ कुटुंबे मदतीस अपात्र चंद्रकांत सोनार

धुळे : सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकाराचे कर्ज , शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य विविध कारणांमुळे गेल्या १५ वर्षांत जिल्ह्यातील ६६४ शेतकºयांनी जीवणयात्रा संपविली आहे़ यात चालूवर्षी अॉक्टोबरपर्यत ५९ शेतकºयांचा समावेश आहे़जिल्हात गेल्यावर्षी तीन महिन्यात १४ शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रातील लहान जिल्ह्यात आत्महत्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे़ जिल्हात तीन वर्षापासून सतत दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे़ दरम्यान गेल्यावर्षी पावसाळ्यातील सुरवातीला जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यात चौदा शेतकºयांनी शेतात विष प्राशन करणे, गळफास घेणे व विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्या होत्या.

मृत्यूनंतरही सरकारचा शेतकºयांवर अन्याय

जिल्हयात २००४ ते २०१८ आॅक्टोंबर महिन्यापर्यत अशा पंधरा वर्षात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत़ मात्र विदर्भाची ओळख दुष्काळग्रस्त असल्याने शेतकरी आत्महत्या सहज सरकारच्या रेकॉर्डवर येतात़ मात्र धुळे जिल्ह्यातील ६४६ आत्महत्या शासकिय रेकॉर्डवर आल्या असतांना देखील फक्त ३६२ आत्महत्या शासनाने ग्राह्य धरल्या आहेत़ तर जाचक अटींमुळे उर्वरीत तब्बल ४४ टक्के आत्महत्या अपात्र ठरविल्या आहेत़ त्यामुळे शेतकºयांवर सरकार त्यांच्या मृत्यूनंतरही अन्याय करत असल्याचे दिसून येत आहे़जिल्ह्यात वर्षभरातील ७२ शेतकºयांची आत्महत्या जिल्ह्यातील शेतकºयांना शेतीशिवाय अन्य व्यवसाय नसल्याने कुटूंबाच उदनिर्वाह शेतीवर अवलंबून असतो़ एैनवेळी पावसाने दांडी मारल्याने अर्थिक संकटाला सामोरे जावे लागते़ त्यामुळे सरकारी व सावकारी कर्जाला कंटाळून आॅक्टोबर २०१७ ते आॅक्टोबर २०१८ या वर्षभरात ७१ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत़ यात जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांत बाळदे, हातनूर, गोराणे, कापडणे, बुरझडे, करवंद, मोघण, म्हसाळे कापडणे, अजंग, निमगुळ, होळ, चिंचखेडे, कुडाशी आदी चारही तालुक्यातील गावांमधील चौदा शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात धुळे तालुक्यातील सर्वाधिक ७, शिंदखेडा २, शिरपूर २ आणि साक्री तालुक्यातील ३ शेतकºयांचा समावेश आहे. साक्री तालुक्यातील शेतकºयांची नाराजी

 

जिल्ह्याला सतत तीन वर्षापासून दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे़ यावर्षी शेतकºयांना उत्पन्नाची अशा होती़ मात्र पेरणीनंतर पावसाने मध्येच दांडी मारल्याने शेतकºयांना शेतात गुंतवलेले भांडवल देखील काढता आलेले नाही़ शासनाने दुष्काळ जाहीर करतांना धुळे, शिंदखेडा, शिरपूर या तिन्ही तालुक्यांचा समावेश केला आहे़ मात्र साक्री तालुक्याचा दुष्काळात समावेश न करून निसर्गाप्रमाणेच सरकारनेही अन्याय केल्याची शेतकºयांची भावना आहे. साक्रीचा दुष्काळी तालुक्यांत समावेश करण्यासाठी शेतकºयांचा लढा अद्याप सुरू आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकºयांनी महाराष्ट्र बंदची हाक, विविध आंदोलने, लॉग मार्च केली केल्यानंतर कर्जमाफी घोषणा केली होती़ मात्र कर्जमाफी संदर्भातही राज्य सरकारची अनास्था दिसत असून गेल्या दीड वर्षांपासून शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागत आहे़ बहुतांश शेतकरी अद्याप कर्जमाफीपासून वंचित असल्याचे विदारक चित्र आहे. त्याचाच परिपाक म्हणून या घटनांत वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारने याची दखल घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त होताना दिसते.गेल्या वर्षी सहाच शेतकऱ्यांचे आत्महत्या पात्रजिल्ह्यात चारवर्षापासुन तिसºयांदा दुष्काळाच्या संकटाला शेतकºयांना सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे गेल्यावर्षी चारही तालुक्यातील चौदा शेतकºयांनी जीवणयांत्रा संपविली होती़ त्यापैकी सहाच शेतकरी आत्महत्या म्हणून पात्र ठरविल्या होत्या़ दरम्यान सरकारच्या जाचक अटीमुळे दरवर्षी शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविल्या जातात.

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे कारणेजिल्हात सतत दुष्काळी परिस्थती शेतमालांचे मालास हमीभाव नसल्याने नाराजी कर्जमाफीची ठप्प झालेली प्रक्रिया कर्जप्रकियेत शेतकºयांना बँकांचा ठेंगा खासगी सावकारांचा शेतकºयांना चक्रवाढीने व्याजदर कुटुंबिक खर्चासह मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, बेरोजगारीचा प्रश्न प्रगतीच्या विचाराने शेतकºयांनी गाठला ‘अ’ दर्जा

 

टॅग्स :Dhuleधुळेfarmer suicideशेतकरी आत्महत्या