लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थातच दसरा सणाच्या निमित्ताने दुचाकी, चारचाकी वाहनांसह, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, ज्वेलरी खरेदीसाठी ग्राहकांची शुक्रवारी बाजारपेठेत प्रचंड गर्दी दिसून आली. शहरातील दुचाकी व चारचाकी वाहनांच्या विविध शोरूममध्ये नागरिकांनी नोंदणी केल्यानुसार शनिवारी ४५० दुचाकी तर २०० चारचाकी गाड्यांची डिलेव्हरी देण्यात येणार आहे. दरम्यान, दसरा सणाच्या पूर्वसंध्येला शहरातील ज्वेलरी दुकानांमध्येही महिलांची गर्दी दिसून आली. शहरात वाहन बाजारासोबतच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारातदेखील ग्राहकांना चांगला प्रतिसाद दिला. वाहनांसोबत एलईडी, वॉशिंग मशीनला ग्राहक विशेष पसंती देत आहेत. फुलांची आवक वाढली नवरात्रोत्सवात विशेषत: फुलांना नागरिकांकडून प्रचंड मागणी असते. त्यापार्श्वभूमीवर धुळे, जळगाव, भुसावळ, रावेर या भागातून झेंडू फुलांची प्रचंड आवक शहरातील बाजारपेठेत झाली आहे. झेंडू फुलांसोबत गुलाब, झेंडू, निशिगंधा, मोगरा, गुलाब आदी फुलांची आवक वाढल्याने ही फुले खराब होऊ नये, म्हणून फुलांच्या किंमतीत गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत घट झाली आहे. झेंडूची फुले तर ४० ते ६० रुपये किलोप्रमाणे विक्री होत असल्याचे फुल विक्रेते संतोष माळी म्हणाले. सोने खरेदीला गृहिणींचे प्राधान्यशहरातील जुन्या आग्रारोडवरील ज्वेलरी दुकानांमध्येही शुक्रवारी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. सोने व चांदीचे भाव काही प्रमाणात कमी झाल्यामुळे या संधीचा फायदा घेत खरेदीसाठी ज्वेलरी दुकानात धाव घेतली. दसरा व पुढे येणारी दिवाळी या सणानिमित्त महिलांनी मंगळसूत्र, नेकलेस, चेन, चपलहार, कानातले, फॅ न्सी प्रकारातील ज्वेलरी, हातातील सोन्याच्या बांगड्या मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या. त्यामुळे सुवर्ण बाजारात लाखोंची उलाढाल झाली.
६५० गाडया आज रस्त्यावर उतरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 4:49 PM
दस-याचा मुहूर्त : खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी; सोने खरेदीला महिलांची पसंती; फुलांची आवक वाढली
ठळक मुद्देनवरात्रोत्सवात २५० चारचाकी वाहनांची विक्री शहरातील मारोती सेवा अॅटोमोटीव्हज येथे संपर्क साधला असता, तेथील व्यवस्थापक नंदू सोनार यांनी सांगितले, की नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेपासून ते आजपर्यंत २५० ग्राहकांनी चारचाकी वाहनासाठी नोंदणी केली आहे.स्वीफ्ट डिझायर या वाहनांना ग्राहकांची विशेष मागणी आहे. काही ग्राहकांनी दसरा सणाच्या दिवशी गाडी मिळायला पाहिजे, यासाठी पितृपक्ष सुरू होण्यापूर्वीच नोंदणी करून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काही ग्राहकांनी महिंद्रा, फोर्ड, फोक्सवॅगन, हुंडाई, होंडा, टाटा