पिंपळनेर : साक्री तालुक्यात गेल्या हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे ऊस लागवडीचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. वास्तविक, तालुक्यात उत्पादित होणारा ऊस हा शेजारी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कारखान्यात पाठविला जातो. मात्र, उत्पादन घटल्यामुळे यावर्षी फक्त 66 हजार टन उसाचेच गाळप झाले आहे. दरम्यान, तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार मिळावा, यासाठी पांझरा कान साखर कारखाना सुरू करावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. साक्री तालुक्यातील मोठय़ा प्रमाणातील ऊस हा शेजारील नाशिक जिल्ह्यातील द्वारकाधीश साखर कारखान्याला पाठविण्यात येत असतो. त्या उद्देशाने एका एकरात 80 टन उसाचे उत्पादन घेणा:या शेतक:याला यावर्षी केवळ 40 टन उसाचे उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे 50 टक्के उसाच्या उत्पादनात घट झाली आहे. शेतक:यांचे उत्पन्न घटले पिंपळनेर, दहिवेल, कासारे, साक्री या ऊस उत्पादक मंडळामध्ये यंदा वर्षी मोठय़ा प्रमाणात दुष्काळ असल्याने त्याचा शेतक:यांना मोठा फटका बसला आहे. पाणी टंचाईमुळे अपेक्षित असलेले उत्पादन न मिळाल्याने शेतक:यांपुढे अडचणी उभ्या राहिल्या आहेत. 25 टक्के उसाचा पुरवठासाक्री तालुक्यात उत्पादित होणारा 25 टक्के ऊस दरवर्षी नाशिक जिल्ह्यातील ऊस कारखान्यांना पाठविला जातो. गेल्यावर्षी द्वारकाधीश साखर कारखान्याचे 4 लाख 86 हजार टन ऐवढा ऊस गाळप करण्यात आला होता. पण यंदा दुष्काळाचा फटका बसल्यामुळे या कारखान्याचे ऊस गाळप 2 लाख 58 हजार टन एवढेच झाले आहे. रब्बी हंगामात शेतक:यांचा ऊस लागवडीवर भर गेल्या 3 वर्षापासून अवकाळी पावसामुळे शेतक:यांच्या हाताशी आलेले पीक वाया जात आहे. मात्र, यंदाच्या हंगामाच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे पिंपळनेरसह परिसरातील धरणांमध्ये ब:यापैकी पाणीसाठा शिल्लक आहे. या सर्व धरणातील पाणी पाटचा:यातून सोडण्यात आल्यामुळे रब्बी हंगामात शेतक:यांनी पुन्हा ऊस लागवडीवर भर दिल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षापासून सतत दुष्काळ, गारपीट यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला. हे सावरण्यासाठी यंदा उस लागवड केली आहे. तालुक्यात मोठय़ा प्रमाणात ऊस असल्याने तो नाशिक जिल्ह्यात निर्यात होतो. तालुक्यातील पांझरा कान साखर कारखाना सुरू व्हावा, ही शेतक:यांची ब:याच वर्षापासूनची मागणी आहे. साखर कारखाना सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींना लक्ष देण्याची गरज आहे. - भूषण बोरसे, शेतकरी, देशशिरवाडे
साक्री तालुक्यातून 66 हजार टन ऊस गाळप
By admin | Published: February 04, 2017 12:02 AM