ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.29 - मोहाडी उपनगरातील महादेव नगरात कुटुंबिय घराच्या गच्चीवर झोपलेले असतांना घरफोडी करून रोख व दागिन्यांसह 70 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आह़े तर एका घरात चोरीचा प्रयत्न झाला़ रविवारी सकाळी चोरी झाल्याचे लक्षात आल़े याप्रकरणी मोहाडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
मोहाडी उपनगरात तिखी रोडवरील महादेव नगरात राहणारे गवळी कुटुंबिय रात्री घराच्या गच्चीवर झोपले असतांना अज्ञात चोरटय़ांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला़ घरातील पत्रटी पेटीसह त्यातील 40 हजार रूपये रोख, 20 हजार रूपये किंमतीचा सोन्याचा 10 ग्रॅम वजनाचा नेकलेस, 8 हजार रूपये किंमतीचे 4 ग्रॅमचे सोन्याचे कानातले टॉप्स, 2 हजार रूपये किंमतीच्या चांदीच्या पाटल्या असा एकूण 70 हजार रूपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला़