आॅनलाइन लोकमतधुळे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये दिल्या जाणाऱ्या सुट्यांचे नियोजन आज जाहीर करण्यात आले. त्यानुसार या शैक्षणिक वर्षात शाळांना एकूण ७६ दिवस सुट्या मिळणार आहे. तर यावर्षी प्रथम सत्र १६ जून १९ पासून सुरू होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे कळविण्यात आलेले आहे.शाळांचे कामकाज वर्षभरात किमान २३० दिवस झाले पाहिजे. सुट्यांचे नियोजन करण्या संदर्भात शिक्षण संचालकांचे आदेश होते. त्यानुसार हे नियोजन करण्यात आले आहे.माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिक्षण संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यात शैक्षणिक वर्ष २०१९-२० या वर्षाचे सुट्यांचे नियोजन करण्यात आले आहे.यात पहिले सत्र १७ जून १९ पासून सुरू होणार असून ते १९ आॅक्टोबर १९ पर्यंत राहील. यात दिवाळीची सुटी २१ आॅक्टोबर ते ९ नोव्हेबर १९ अशी १८ दिवसांची राहणार आहे.द्वितीय सत्राला ११ नोव्हेबरपासून सुरूवात होईल. ते ३० एप्रिल २० पर्यंत राहील. त्यानंतर १ मे २० रोजी उन्हाळी सुटी सुरू होईल. २०२० मध्ये उन्हाळी सुटी ३७ दिवसांची असेल. या शैक्षणिक वर्षात सार्वजनिक व प्रासंगिक सुट्यांची संख्या १९ एवढी असून, मुख्याध्यापकाधिक , स्थानिक सुट्या दोन असतील. अशा एकूण ७६ दिवस शाळांना सुटी राहणार आहे.
धुळे जिल्ह्यातील शाळांना वर्षभरात मिळणार ७६ सुट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:20 AM
शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे माध्यमिक विभागाचे नियोजन पूर्ण
ठळक मुद्देमाध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली बैठकबैठकीत वर्षभराचे करण्यात आले नियोजनप्रथम सत्र १७ जून १९ पासून सुरू होणार