ऑनलाइन लोकमतब-हाणपूर, दि. 29 - येथून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या धामणगाव येथे आयोजित विश्वस्तरीय पशुमेळाव्यात हरियाणा, कुरक्षेत्र येथील 9 कोटी किमतीचा रेडा दाखल झाला आहे. युवराज नावाने ओळखल्या जाणा-या या रेड्यासाठी रोज 21 लिटर दूध, 10 किलो बदाम आणि चांगल्या दर्जाच्या चा-याची खुराक रोप दिली जाणार आहे. धामणगाव येथे बुधवार 29 पासून राज्यस्तरीय पशू मेळाव्याचे आयोजन केले आहे. आठवडाभर हा मेळावा चालणार असून, मेळाव्यात देशातील विविध राज्यातून आणल्या गेलेल्या विविध जातीच्या प्राण्यांच्या प्रदर्शनासोबत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. पशू मेळाव्यात जुनागढ येथून अँगोल जातीचा नंदी आणण्यात येणार आहे. आठवडाभर चालणा-या या पशू मेळाव्यात हरियाणा, कुरुक्षेत्र येथील 9 कोटी रुपये किमतीचा युवराज नावाचा रेडा हे प्रमुख आकर्षण असणार आहे. 1260 किलोमीटर प्रवास करून युवराज धामणगावात दाखल झाला आहे. कुरुक्षेत्र येथून रविवारी निघालेला युवराज रोज 375 किलोमीटर प्रवास करीत होता. प्रवासादरम्यान युवराजच्या मागे एक कंटेनर होता. त्यात ढेप, दूध आणि रेड्याच्या खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. उन्हापासून बचाव करण्यासाठी कुलरची व्यवस्था करण्यात आली होती.