आॅनलाइन लोकमतधुळे : गुरांची कत्तल करून त्यांचे मांस गोडावूनमध्ये साठवून वाहतूक करणाऱ्या १० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी ९ जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी सहा चाकी ट्रकसह दोन दुचाकी, इलेक्ट्रॉनिक काटा असा एकूण १२ लाख ८९ हजार ३२० रूपयांचा माल जप्त केला. ही कारवाई ३ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास करण्यात आली.संशयित आरोपींनी गायी, बैलांची कत्तल करून त्यांचे मांस शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील साई निवारा लॉजच्या बाजुला अबुजद साबीर खान याच्या मालकीच्या गोडावून मध्ये साठवून ठेवले होते. या मासाची वाहतूक करण्यासाठी सहा चाकी ट्रकमध्ये (क्र. एमएच १८-एम ८८८८) १०० किलोच्या प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये ते भरण्यात आले होते. पोलिसांनी मांस वाहतूक करणाºया ट्रकसह दोन दुचाकी (क्र. एमएच ४१ एस २४२८ व एमएच ४१-वाय १९३) तसेच इलेक्ट्रीक काटा असा एकूण १२ लाख ८९ हजार ३२० रूपयांचा माल जप्त केला.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रेमराज विक्रम पाटील यांनी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून मुजम्मील अहमद खान (३१, रा. मालेगाव), अशरफखान अय्युब खान (४९,रा. मालेगाव), कुरेशी मुदस्सर अहमद खान,(२४), अरशद खान अल्ताफ खान (२१), शे.तौसिफ शे. रफीक (२१), शे.सलिम शे. शकील (३२), अबुजैद शे.कादर (२०), शफिक मोहंमद हुसेन (३८), मोहंमद अय्युब मो.युनुसखान (३८), अबुजैद साबीर खान (रा. धुळे) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी १ ते ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक पी.ए. शिरसाठ करीत आहेत.
धुळे येथे गुरांच्या मांसाची वाहतूक करणाऱ्या ९ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 11:49 AM
ट्रक,दोन दुचाकीसह १३ लाखांचा माल जप्त
ठळक मुद्देपोलिसांनी ट्रकसह दोन दुचाकी जप्त केल्यानऊ जणांना अटकएकजण फरार