शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान गाव शिवारात एका शेतात नितीन साहेबराव पावरा याने त्याच्या शेतातील घरात गांजा लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. माहिती मिळताच शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, कर्मचारी श्यामसिंग वळवी, संजय जाधव, संतोष देवरे, कुंदन पवार, योगेश दाभाडे, योगेश मोरे, योगेश मोरे, गोविंद कोळी, इसरार फारुकी यांनी त्या घरात छापा टाकला. संशयित नितीन पावरा हा पोलिसांना पाहून पळून गेला आहे. त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत १८ किलो वजनाचा ९० हजार रुपये किमतीचा कोरडा गांजा आढळून आला. तो पोलिसांनी जप्त केला असून फरार नितीन साहेबराव पावरा याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
शेतातील घरातून ९० हजारांचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:40 AM